गावचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सरपंचासह पदाधिकाऱ्यांची धडपड



नगर तालुका (प्रतिनिधी)  – उन्हाळ्याची चाहूल लागली असून गावागावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत आता कमी होवू लागले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगर तालुक्यातील आगडगाव येथे ही अशी परिस्थिती उद्भवण्याची वेळ येवू नये म्हणून लोकनियुक्त सरपंच परमेश्वर पालवे, उपसरपंच संदिप कराळे यांनी यावर उपाययोजना सुरु करत गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त असलेली बारदरी ते आगडगाव पाईपलाईन दुरुस्थीचे काम युद्ध पातळीवर सुरु केले आहे.    

आगडगांव, टोकेवाडी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने बारदारी येथे विहिर खोदून तेथून पाईपलाईन द्वारे गावाला पाणी पुरवठा केला जातो. सदरची पाईपलाईन गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त झालेली होती. गावात पाणी उपलब्ध असल्याने या पाणी योजनेची गरज भासली नव्हती मात्र आता उन्हाळा सुरु झाला असल्याने या योजनेची आवश्यकता भासणार असल्याने सरपंच पालवे व उपसरपंच कराळे यांनी पुढाकार घेत पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने बारदरी येथील विहिरीचे खोलीकरण करुन नादुरुस्त पाइपलाईनची दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर काम चालू केले आहे.

आगडगांवातील नागरीकांना लवकरात लवकर कसे पिण्याचे पाणी नळाद्वारे मिळेल याची दक्षता घेतलेबद्ल आगडगांवातील सामाजिक कार्यकर्ते विकास कराळे, कुंडलिक कराळे, सोपान कराळे, दिगंबर सुरुंकर, बाबासाहेब कराळे, मनोज कराळे, सावळेराम कराळे, शेखर कराळे, अनिल कराळे, गोटूराम कराळे, अंकुश कराळे, संजय करपे, महेश बोरूडे, सचिन बोरुडे, सुरेश गायकवाड, शंकर पागिरे, भाऊसाहेब कराळे, वैभव कराळे, संदिप कराळे, संजय कन्हेरकर, जालिंदर कराळे, मच्छिंद्र पागिरे, नाना कराळे, राहुल बोरुडे, बलभिम गायकवाड, पोपट कराळे, रामदास गायकवाड, शिवाजी गायकवाड, माजी चेअरमन नामदेव कराळे, माजी चेअरमन एकनाथ पालवे, भिमा भिंगारदिवे, शिवाजी भिंगारदिवे, शंकर यादव कराळे, परसराम माधव कराळे, माजी उपसरपंच पंढरीनाथ कराळे, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश कराळे, चेअरमन अशोक गुंजाळ यांच्या सह आगडगांव, टोकेवाडी ग्रामस्थांचे वतीने लोकनियुक्त सरपंच परमेश्वर पालवे व उपसरपंच संदिप कराळे यांचे जाहिर आभार व्यक्त केले आहेत.

हे ही वाचा ...

संजू सॅमसनचं आयसीसीच्या टी-20 रँकिंगमध्ये वादळ!

जीवघेण्या आजाराशी झुंजतेय मराठी अभिनेत्री

शारजा ते कुवेत दरम्यान समुद्रात जहाजावर अडकला नगर जिल्ह्यातील तरुण

भारतातून निघालेली युद्धनौका बुडवली, ८० ठार; इराणकडून २४ तासांत बदला 

0/Post a Comment/Comments