अहिल्यानगरच्या नेप्ती उपबाजारातील कांदा लिलाव मार्च अखेरमुळे २ दिवस बंद राहणार


नगर तालुका (प्रतिनिधी) - सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाची अखेर असल्याने बँकांचे व्यवहार बंद राहणार आहेत. त्यामुळे नेप्ती उपबाजार समिती (कांदा मार्केट) येथील २९ व ३१ मार्च रोजीचे सर्व व्यवहार व कांदा लिलाव बंद राहणार आहेत. दि.१ एप्रिल पासून कांदा लिलाव पूर्ववत चालू राहतील अशी माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे.

याबाबत भाजीपाला, फळफळावळ आडते असोसिएशनने बाजार समितीला तसेच जिल्हा हमाल पंचायत च्या अध्यक्षांना निवेदन देवून सन २०२४- २०२५ आर्थिक वर्ष अखेर असल्याने बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे कांदा लिलावाच्या व्यवहारास अडचण येणार असल्याने, तसेच राज्यातील इतर व परराज्यातील बाजार समित्या बंद राहणार असल्याने नेप्ती उपबाजार समिती (कांदा मार्केट) येथील २९ व ३१ मार्च रोजीचे व्यवहार व कांदा लिलाव बंद ठेवावेत अशी मागणी केली होती. त्यानुसार बाजार समिती प्रशासनाने कांद्याचे २ लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी २९ मार्च व ३१ मार्च  रोजी कांदा विक्रीसाठी आणू नये असे आवाहन बाजार समितीने केले आहे. तसेच दि.१ एप्रिल पासून कांदा लिलाव पूर्ववत चालू राहतील असे आवाहन बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ, सचिव अभय भिसे, सहाय्यक सचिव संजय काळे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments