अहिल्यानगर (प्रतिनिधी) - राहुरी तालुक्यातील वाबळेवाडी येथे 'कोंबडी चोर' बिबट्या पोल्ट्रीत शिरल्याने मोठी खळबळ उडाली होती. पोल्ट्री फार्मच्या जाळ्या उचकटून मादी बिबट्या पोल्ट्री फार्ममध्ये शिरली. तीन चार कोंबड्यांचा फडशाही पाडला. पण अचानक लाईट गेल्याने बिबट्याची पंचयत झाली. त्याला बाहेरचा रस्ताच दिसेना. त्यामुळे बाहेर जाण्याचा रस्ता शोधण्यासाठी बिबट्या पोल्ट्री फार्ममध्ये जोरजोरात धावू लागला. बिबट्याच्या वावरामुळे पोल्ट्रीतल्या कोंबड्या ओरडू लागल्या. अवेळी कोंबड्या ओरडत असल्याचं लक्षात येताच शेतकऱ्याने पोल्ट्रीकडे धाव घेतली. तेंव्हा त्याला बिबट्या आत अडकल्याचे दिसले. शेतकऱ्याने लगेच वनविभागाला फोन लावला. आणि नंतर वनविभागाने बिबट्याला जेरबंद करून रेस्क्यू केलं आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील वाबळेवाडी येथे एका शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्याचा थरार पाहायला मिळाला.पहाटेच्या सुमारास वीजपुरवठा खंडित असताना चार वर्षांची बिबट्याची मादी पोल्ट्री फार्मच्या जाळीतून आत शिरली. ही घटना काल (मंगळवारी) घडली.शेतकरी नामदेव सुखदेव वाबळे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये ही बिबट्याची मादी शिरली होती. आत शिरताच तिने तीन ते चार कोंबड्यांचा फडशा पाडला. अंधारामुळे बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता, त्यामुळे बिबट्या फार्ममध्ये रस्ता शोधत फिरत होता.रात्री कोंबड्या अचानक ओरडू लागल्याने शेतकरी वाबळे यांना शंका आली. त्यांनी पाहणी केली असता बिबट्या आत अडकल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली.
वन विभागाने घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन राबवले. योग्य नियोजनानंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. ही बिबट्याची मादी सुरक्षित असून, पुढील प्रक्रिया वन विभागाद्वारे करण्यात येणार आहे.या घटनेमुळे वाबळेवाडीसह परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र वन विभागाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. राहूरीत या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून बिबट्याचा वावर होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Post a Comment