केडगावातून २० वर्षीय तरुणी बेपत्ता, बाजारात भाजीपाला आणायला गेली अन...


अहिल्यानगर (प्रतिनिधी) - बाजारात भाजीपाला आणायला गेलेली २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना केडगाव परिसरात १० एप्रिल रोजी सकाळी घडली आहे. या प्रकरणी बेपत्ता तरुणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार कोतवाली पोलिसांनी हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

केडगाव परिसरातून १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास २० वर्षीय तरुणी भाजीपाला आणण्यासाठी बाजारात जाते असे सांगून घरातून बाहेर पडली. ती उशिरापर्यंत घरी परत आली नाही

त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिचा केडगाव परिसर, तिच्या मैत्रिणीकडे, नातेवाईकांकडे, नगर शहरात शोध घेतला असता ती कोठेही मिळून आली नाही. त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात जावून माहिती दिली. पोलिसांनी या माहितीवरून हरविल्याची नोंद केली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

0/Post a Comment/Comments