शिर्डी - श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डीतील श्री साईबाबांच्या खजाण्यात दिवसेंदिवस मौल्यवान हिरे,सोने चांदी याबरोबरच रोख स्वरुपात पैसे यांचे मोठे दान साई भक्तांकडून दान जमा होत आहे.शनिवारी (दि.१९ एप्रिल) आंध्रप्रदेशातील
एका साईभक्ताने ६८ लाख रुपयांचा सुवर्ण मुकूट अर्पण केला, अशी माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
शिर्डी येथील श्री
साईबाबांच्याचरणी देश विदेशातील कोट्यवधीभाविक आपली श्रद्धा व्यक्तकरण्यासाठी साईबाबांच्या झोळीतभरभरून दान देत असतात. यात सोनेचांदी हिरे तसेच रोख रक्कम यासहइतर मौल्यवान वस्तूंचा समवेशअसतो. मागील काही वर्षांपासूनभाविकांकडून दानात येणाऱ्यासाईबाबांच्या सुवर्ण मुकुटांच्यासंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
शनिवारी आंध्रप्रदेशातील
गुंटूरयेथील एका साईभक्ताने श्रीसाईचरणी ७८८.४४ ग्रॅम वजनाचाआकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्णमुकुट अर्पण केला आहे. या मुकुटाची किंमत
अंदाजे ६८ लाखरुपये असल्याची माहिती श्री साईबाबासंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारीगाडीलकर यांनी दिली. त्यामुळेसाईबाबा संस्थानकडे सुवर्णमुकुटांची संख्या २८ वर गेली आहे.
Post a Comment