अहिल्यानगर - शिवसेना शिंदे
गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप सातपुते यांच्या चारचाकी वाहनाचा शनिवारी (१७ मे) रात्री
उशिरा भीषण अपघात झाला. जामखेड रोडवर नगर तालुक्यातील सारोळा बद्दी येथे कार
पुलावरून खाली कोसळली. यात कार पलटी झाली असून कारमधील एकाचा मृत्यू झाला आहे. तर
कारचालक व सातपुते हे जखमी झाले आहेत.
तलाठी महेंद्र मालन काळे (वय 40, रा. भूषणनगर, केडगाव) असे मयताचे नाव आहे. तर कार चालक भाऊ कांडेकर हे जखमी झाले आहेत. सातपुते व त्यांचे सहकारी शनिवारी बीड येथे लग्नासाठी गेले होते. तेथून परतताना रात्री बाराच्या सुमारास सारोळा बद्दी येथे त्यांची कार अचानक छोट्या पुलावरून खाली कोसळली.
यात कार पलटी झाल्याने
कारमधील तलाठी काळे यांचा मृत्यू झाला. अपघातात सातपुते हे बचावले आहेत तर कार
चालक कांडेकर हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात
उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात
करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ आव्हाड करत आहेत.
Post a Comment