१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले


नगर – नगर शहरासह जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेण्याच्या घटना वाढतच असून अशीच आणखी एक घटना नगर शहरात घडली आहे. नगरच्या एमआयडीसी परिसरातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची शनिवारी (दि.२०) सकाळी घडली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सदर अल्पवयीन मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी ही मजुरी काम करुन त्यांच्या  कुंटुंबाची उपजिविका भागविते. त्यांची १७ वर्षे वयाची मुलगी शनिवारी (दि.२०) घरातून बेपत्ता झाली. ती बराच वेळ घरी न आल्याने तिच्या आईने तिचा आजुबाजुच्या परीसरात शोध घेतला व तिच्या मैत्रिणकडे विचारणा केली असता काहीही माहिती भेटली नसुन ती कोठेही मिळुन आली नाही. 

त्यामुळे आपल्या मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी आपल्या कायदेशीर रखवालीतुन पळवून नेले आहे असे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात भा. न्या. सं. २०२३ चे कलम १३७ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


 

0/Post a Comment/Comments