नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्याच्या दक्षिण भागात मंगळवारी (दि.२७) दुपारपासून ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला असून या पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला आहे. तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या पूर्वा व वालुंबा या नद्यांना इतिहासात प्रथमच एवढा मोठा महापूर आला असून नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडत पाणी शेतात घुसले आहे. या पावसामुळे आणि आलेल्या पुरामुळे गावागावांचा संपर्क तुटला असून खडकी येथे जनावरे तर सारोळा कासार येथे वाहने वाहून गेली आहेत. जागोजागी रस्तेही वाहून गेले आहेत. त्यामुळे मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
नगर तालुक्यातील कामरगाव, चास, भोरवाडी, सोनेवाडी, अकोळनेर, सारोळा कासार, अस्तगाव, खडकी, बाबुर्डी बेंद या परिसरात दुपारी १२.३० च्या दरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच पावसाने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे कामरगाव परिसरात उगम पावणार्या वालुंबा नदीला काही वेळातच महापूर आला. या पुरामुळे अकोळनेर ते भोरवाडी रस्ता वाहून गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला. नदीवरील सारोळा गावाकडे जाणार्या रस्त्यावरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत असल्याने अकोळनेर ते सारोळा वाहतूकही ठप्प झाली. अस्तगावकडून पूर्वेकडे वाहणार्या पूर्वा नदीलाही मोठ्या प्रमाणावर पूर आला. त्यामुळे अस्तगाव-सारोळा रस्त्यावरील वाहतूक बंद झाली.
सारोळा ते घोसपुरी मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने या दोन्ही गावांचाही संपर्क तुटला आहे. पूर्वा व वालुंबा या दोन्ही नद्यांचा संगम खडकी परिसरात होत असल्याने खडकी गावात पावसाचे पाणी घुसले. एक-दोन घरांना या पाण्याने वेढा दिला. खडकी येथील काही शेतकर्यांची जनावरे पुरात वाहून गेली. सारोळा कासार येथेही ट्रॅक्टर ट्रॉलीसह नदीच्या प्रवाहात वाहून गेला.
परिसरातील सर्व गावांधील गावतलाव, बंधारे ओसंडून वाहत असून ते फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी नदीच्या पाण्याने प्रवाह बदलून सदर पाणी शेतांध्ये घुसल्याचे पाहावयास मिळाले. या महापुरामुळे वाळकी परिसरातील धोंडेवाडी येथील साठवण तलाव इतिहासात पहिल्यांदाच मे महिन्यात मंगळवारी (दि.२७) सायंकाळपर्यंत ओव्हरफ्लो होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Post a Comment