अरणगावच्या 'त्या' हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार, अल्पवयीन मुलीला अनेकदा नेले अन...



अहिल्यानगर - लग्नाचे आमिष दाखवून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात नराधम आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण जिल्ह्यात या घटनेने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सावेडी परिसरातील रहिवासी असलेल्या सुरज शरद गायकवाड याने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवले होते. सप्टेंबर २०२४ पासून ते ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आरोपीने पीडितेला अरणगाव येथील एका हॉटेलमधील खोलीत नेऊन तिच्यावर वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीच्या सततच्या जाचाला कंटाळून अखेर पीडितेने या प्रकरणाची तक्रार दिली.

सुरुवातीला हा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने दाखल करण्यात आला होता, मात्र घटनेचे गांभीर्य आणि घटनास्थळ लक्षात घेता तो आता नगर तालुका पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. मंगळवारी (दि.१७) दुपारी या गुन्ह्याची अधिकृत नोंद करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हे ही वाचा ...

पाक सैन्याच्या चेक पोस्टवर आत्मघाती हल्ला, ११ सैनिक ठार, भारतावर गंभीर आरोप

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार? असं असू शकतं टी २० वर्ल्डकपचं समीकरण

0/Post a Comment/Comments