दुर्दैवी घटना... कडबाकुट्टी करायला गेलेल्या महिलेचा विजेचा शॉक बसून मृत्यू


नगर तालुका (प्रतिनिधी) - पहाटे उठून जनावरांसाठी चारा कापण्यासाठी गोठ्यात कडबाकुट्टी मशीन चालू करायला गेलेल्या महिलेचा  विजेचा शॉक बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील गुंडेगाव शिवारातील हराळमळा येथे ३ जून रोजी सकाळी घडली. सौ.सुजाता संभाजी भापकर (वय ३६) असे मयत महिलेचे नाव आहे.

सुजाता भापकर यांना विजेचा शॉक बसून त्या बेशुध्द पडल्याने निदर्शनास येताच त्यांचे पती माजी सैनिक संभाजी तुकाराम भापकर यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.बटूळे यांनी त्यांना तपासून त्या उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत सुजाता भापकर यांच्यावर हराळमळा येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, १ मुलगा, १ मुलगी, सासू सासरे असा परिवार आहे.

0/Post a Comment/Comments