श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील नेवासा रोडवरील हॉटेल लक्ष्मीनारायणचे तरुण हॉटेल चालक-मालक आकाश शेखर दुबैय्या/ वेंकटरामन,यांचा त्यांच्या हॅाटेलमध्येच आरोपी सुरज जाधव व साथीदारांनी आज शनिवारी (दि.11 जुलै) दुपारी ४ वा.च्या सुमारास कोयत्याने वार करून खून केला आहे. या हल्ल्यात त्याचा चुलत भाऊ कुणाल कैलास दुबय्या जखमी झालेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुरेश सतीश जाधव (रा. खिलारी वस्ती) यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा रोडवरील हॉटेल लक्ष्मी नारायण येथे काहीजण जेवणासाठी आलेले होते. जेवण झाल्यानंतर बिलावरून त्यांची हुज्जत घालण्यास सुरूवात केली. यावेळी हॉटेल चालक या ठिकाणी आले व त्यांनी बिल पूर्ण देण्यास सांगितले. यावरून परत त्यांच्यात वाद सुरू झाला. जेवणासाठी आलेल्या पैकी एकाने आकाश यांच्या डोक्यात कोयता घातला. याचवेळी भावाच्या मदतीस आलेल्या कुणाल दुबय्या याच्यावही आरोपींनी हल्ला चढविला. त्याच्यावरही कोयत्याने वार करण्यात आले.
आकाश दुबैय्या यांना साखर कामगार रुग्णालयात नेले असता प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॅा.रवींद्र जगधने यांनी त्यांना मयत घोषित केले. आरोपी सुरज जाधव हा नेवासारोडला बस स्टॅण्डसमोर चिकन टिक्क्याची गाडी चालवणारा असून तो शहरातील एका मोठ्या गुन्हेगाराशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून समजती आहे.

Post a Comment