घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग नियमात बदल, जाणून घ्या बुकिंगचे ४ वेगवेगळे प्रकार....



दिल्ली - केंद्र सरकारने घरगुती LPG गॅस सिलिंडरच्या बुकिंग नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता दोन सिलिंडर बुकिंगमध्ये किमान 25 दिवसांचे अंतर असणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापूर्वी हे अंतर 21 दिवस होते. पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन, देशात गॅसची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

LPG Gas बुकिंग नियमात बदल करण्याचे कारण काय?

सरकारी सूत्रांनुसार, इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत काही नागरिक अनावश्यक साठेबाजी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वी अनेक ग्राहक सरासरी 55 दिवसांनी सिलिंडर बुक करत होते, मात्र सध्याच्या भीतीपोटी 15-20 दिवसांतच बुकिंग करत आहेत. यामुळे पुरवठा साखळीवर ताण येत असून, सर्वांना समान प्रमाणात गॅस उपलब्ध व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
LPG Gas बुकिंगचा नवा नियम नेमका काय?

एक सिलिंडर मिळाल्यानंतर पुढील सिलिंडरसाठी तुम्हाला 25 दिवस प्रतीक्षा करावी लागेल.
25 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणतीही बुकिंग स्वीकारली जाणार नाही.
गॅस कंपन्यांनी त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये हा बदल अपडेट केला आहे.
तुम्ही घरबसल्या तुमच्या सोयीनुसार विविध पर्यायांचा वापर करून गॅस बुकिंग करू शकता:

ऑनलाईन गॅस बुकिंग कशी करावी?

1. WhatsApp द्वारे गॅस बुकिंग

Indane:7718955555 या क्रमांकावर 'REFILL' लिहून पाठवा.
HP Gas: 9222201122 या अधिकृत क्रमांकावर मेसेज पाठवा.
Bharat Gas:1800224344 या क्रमांकावर 'Hi' पाठवून बुकिंग प्रक्रिया सुरू करा.

2. मोबाइल ॲपद्वारे गॅस बुकिंग

तुमच्या गॅस कंपनीचे अधिकृत ॲप (IndianOil One, HP Pay, Hello BPCL) डाउनलोड करा.
तुमचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक वापरून लॉगिन करा आणि 'Refill Booking' पर्यायावर क्लिक करा.

3. अधिकृत वेबसाइटवरून गॅस बुकिंग

तुमच्या गॅस कंपनीच्या पोर्टलवर (उदा. My Indane, My HP Gas, eBharatGas) जा.
लॉगिन करा आणि ऑनलाइन पेमेंट करून बुकिंग पूर्ण करा.

4. IVRS/SMS द्वारे गॅस बुकिंग

तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून गॅस एजन्सीच्या अधिकृत क्रमांकावर कॉल करा (Indane साठी 7718955555) आणि सूचनांचे पालन करा.

 


0/Post a Comment/Comments