देवदर्शनाला निघाले, पण काळाचा वाटेतच घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ६ जण ठार



अहिल्यानगर - अहिल्यानगर जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. श्रीरामपूर–संगमनेर रस्त्यावर खंडाळा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 6 वर्षांचा एक मुलगा गंभीर जखमी आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर मृत्यूने वाटेतच झडप घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

स्विफ्ट कार आणि ट्रकची समोरासमोर धडक

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे देवदर्शनासाठी जात असताना स्विफ्ट कार आणि मालवाहू ट्रकची जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळीच 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.या दुर्घटनेत वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, बचावकार्य करताना स्थानिकांना मोठी कसरत करावी लागली.

6 वर्षांचा मुलगा जीवनासाठी झुंजतोय

या अपघातात रुद्र अशोक चव्हाण (वय 6) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

समोर आलेल्या माहितीनुसार श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला आहे. ट्रक आणि कारची भीषण धडक झाली, हा अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळीच जाग्यावर 5 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी होते, मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे, तर या अपघातामध्ये जखमी असलेल्या एका 6 वर्षांच्या मुलावर उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

या अपघातामध्ये प्रशांत रमेश चव्हाण (24),संगीता अनिल चव्हाण (40),सिद्धार्थ सुनील चव्हाण (16),सारिका अनिल चव्हाण (30),ऋत्वी अशोक चव्हाण (3),ऐश्वर्या अशोक चव्हाण (26) यांचा मृत्यू झाला आहे.
एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्याने खंडाळा आणि श्रीरामपूर परिसरात शोककळा पसरली आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या या कुटुंबावर आलेल्या या काळ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा ... 

प्रदर्शनाच्या एक दिवस आधी ‘द केरळ स्टोरी 2’ला हायकोर्टाचा मोठा झटका  

तुळशीचे रोप लावताना लक्षात ठेवा हे नियम! नशीब बदलेल

0/Post a Comment/Comments