पारनेर (प्रतिनिधी) - माजी आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्या टोयाटो कंपनीच्या इनोव्हा गाडीला १६ जून रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास पारनेर तालुक्यातील वडझिरे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कळमकर यांच्या सह वाहन चालक तसेच त्यांचे सहकारी श्री. पानमंद हे तिघे सुखरूप आहेत. मात्र वाहनाचे समोरील बाजूने मोठे नुकसान झाले आहे.
श्री. कळमकर हे त्यांचे सहकारी श्री. पानमंद यांच्या सह इनोव्हा गाडीने दुपारी पारनेर हून वडझिरे येथे एका विवाह समारंभासाठी जात होते. वडझिरे गावापासून अलीकडे १ किमी अंतरावर समोरून आलेल्या जेसीबी ची आणि त्यांच्या गाडीची जोराची धडक झाली. या धडकेने इनोव्हा गाडीच्या एअरबॅग उघडल्या गेल्या. त्यामुळे चालकासह गाडीतील तिघांनाही मोठी दुखापत झाली नाही. या भीषण अपघातातून सर्वजण सुखरूप बचावले आहेत. अपघातात गाडीचे पुढील बाजूने मोठे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले.
Post a Comment