www.mazamaharashtra.in
नगर
तालुका (प्रतिनिधी) – पती – पत्नीचे वाद झाल्याने पत्नी माहेरी निघून गेल्यावर पत्नीच्या
माहेरकडील नातेवाईकांनी पतीला बेदम मारहाण करत त्याचे हातपाय बांधून चारचाकी
वाहनातून त्याचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे घडली.
या प्रकरणी १० जणांवर गुन्हा दाखल झाला असून त्यातील दोघांना नगर तालुका
पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.
रवींद्र रामदास भिसे (रा. गुंडेगाव, ता.नगर) असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या मुलीने दिलेल्या फिर्यादी वरून नितीन भगवान वाघमोडे, प्रेमराज उर्फ किरण बाळासाहेब वाघमोडे, अभिमन्यू अर्जुन वाघमोडे, सुभाष पोपट पडोळकर, बाळासाहेब अर्जुन वाघमोडे, भगवान वाघमोडे यांच्या सह ४ अनोळखी इसम (सर्व रा. देऊळगाव सिद्धी, ता.नगर) यांच्या विरुद्ध गुरुवारी (दि.२३) दुपारी अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा
दाखल होताच स.पो.नि. प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जयेश
गांगुर्डे व पथकाने नितीन भगवान वाघमोडे, प्रेमराज उर्फ किरण
बाळासाहेब वाघमोडे या दोघांना ताब्यात घेत अटक केली आहे.www.mazamaharashtra.in
अपहरणाची
ही घटना बुधवारी (दि.२२) रात्री ९.३० च्या सुमारास गुंडेगाव येथे घडली होती.
आरोपींनी चारचाकी गाडीत येवून रवींद्र रामदास भिसे यांना बेदम मारहाण केली.
त्यानंतर त्यांचे हातपाय बांधून चारचाकी वाहनातून अपहरण केल्याचे फिर्यादीत
म्हंटले आहे.
Post a Comment