पहलगाम हल्ला, भारताकडून पाकिस्तानच्या नाड्या आवळायला सुरुवात, घेतले ५ मोठे निर्णय



नवी दिल्ली - पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) बैठकीत पाच प्रमुख निर्णय घेण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेली सीसीएस बैठक अडीच तास चालली. त्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, एनएस अजित डोभाल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, 'पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, कॅबिनेट सुरक्षा समितीने (CCS) 5 प्रमुख निर्णय घेतले आहेत-

  • पहिला: पाकिस्तानसोबतचा १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. पाकिस्तान सीमापार दहशतवादाला विश्वासार्ह आणि अपरिवर्तनीयपणे पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत हा करार स्थगित करण्यात आला आहे.
  • दुसरा: अटारी एकात्मिक तपासणी नाका तात्काळ बंद करण्यात येत आहे. ज्यांनी वैध परवानगी घेऊन या मार्गाने सीमा ओलांडली आहे ते १ मे २०२५ पूर्वी त्याच मार्गाने परत येऊ शकतात.
  • तिसरा: पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत (SVES) भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पूर्वी जारी केलेले सर्व SVES व्हिसा अवैध मानले जातील. सध्या SVES व्हिसावर भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडावा लागेल.
  • चौथा: नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई दल सल्लागारांना पर्सना नॉन ग्राटा घोषित करण्यात आले आहे. त्यांना भारत सोडण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
  • पाचवा: भारत इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून त्यांचे संरक्षण, नौदल आणि हवाई दल सल्लागार मागे घेत आहे. संबंधित उच्चायोगांमध्ये ही पदे रद्द मानली जातील.
  • सरकारने गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. दुसरीकडे, पहलगामच्या बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी श्रीनगर ते दिल्ली अशा अनेक बैठका झाल्या.

0/Post a Comment/Comments