अहिल्यानगर - खेळताना अंगावर दगड पडल्याने ४ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू


नगर तालुका (प्रतिनिधी) - सिना नदीच्या काठावर मित्रांसोबत खेळत असलेल्या ४ वर्षाच्या मुलाच्या अंगावर दगड पडल्याने जखमी होवून त्याचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील शिराढोण गावच्या शिवारात १२ मे रोजी दुपारी घडली. सार्थक नवनाथ गोलवड (वय ४, रा. शिरढोण, ता. नगर ) असे मयत बालकाचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी की सार्थक गोलवड हा मुलगा त्याच्या मित्रांसोबत शिरढोण गावामध्ये सीना नदीच्या काठावर खेळत असताना त्याच्या अंगावर दगड पडल्याने तो बेशुद्ध झाला. त्यास सुनील दरेकर यांनी दुपारी २.५० वाजण्याच्या सुमारास तातडीने औषधोपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून तो औषधोपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे घोषित केले.

याप्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बोठे यांच्या अहवालावरून नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गणेश लबडे हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments