अहिल्यानगर - जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची बदली बृहन्मुंबईचे पोलीस उपायुक्त म्हणून झाली असून त्यांच्या जागी रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना जानेवारी मध्येच पदोन्नती देण्यात आलेली होती, त्यांना निवडश्रेणी मिळाली होती मात्र त्यावेळी त्यांना आहे त्याच ठिकाणी नियुक्ती देण्यात आली होती. आता ते बृहन्मुंबईचे पोलीस उपायुक्त झाले आहेत. तर रायगड येथून बदलून आलेले सोमनाथ घार्गे यांनी यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक म्हणून काम पाहिले असून श्रीरामपूर पोलीस उपअधीक्षक म्हणून ते नियुक्त होते. त्यामुळे त्यांना जिल्ह्याची बऱ्यापैकी माहिती असणार आहे.
बहुचर्चित देवळाली प्रवरा येथील बबलू पंडित हत्याकांडाचा तपास सुद्धा त्यांच्याकडे होता. आता त्यांच्यासमोर आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपंचायत निवडणुका शांततेत पार पाडण्याची जबाबदारी असेल.
Post a Comment