पोलिसांना टीप देतो काय असे म्हणत आठ जणांकडून तिघांना बेदम मारहाण करत घरावर दगडफेक


नगर तालुका (प्रतिनिधी) - जनावरे कत्तल करण्याच्या व्यवसायाची पोलिसांना टीप देतो त्यामुळे आमच्यावर रेड पडून नुकसान झाले. ते भरुन दे असे म्हणून आठ जणांनी लोखंडी रॉड, लाकडी दांडके, लोखंडी फायटर व दगडाने बेदम मारहाण करुन 2 तोळ्याचे सोन्याचे दागिने बळजबरीने घेऊन घरावर दगडफेक केल्याची घटना नगर तालुक्याचे जेऊर बायजाबाईचे येथे 25 जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली.

 याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आवेज सलीम कुरेशी (वय. 21 रा. जेऊर बायजाबाईचे, ता. नगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादीचा भाऊ समशेर यास मुनाफ चांद शेख, व इकबाल मुनाफ शेख यांनी अडवले. आणी आम्ही जनावरे कापण्याचा व्यवसाय करतो. त्याची टीप तुम्ही पोलिसांना देता त्यामुळे आमचे वर रेड पडून कारवाई झाली. त्यात आमचे जे नुकसान झाले ते भरून द्या असे म्हणून फिर्यादीच्या भावास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे समशेर हा घाबरुन घरी आला. व त्याने फिर्यादी व त्याच्या आईस झाला प्रकार सांगितला. तोपर्यंत मुनाफ चांद शेख, इकबाल मुनाफ शेख, इमरान चांद शेख, मुजफ्फर चांद शेख, मुजाहिद हबीब शेख, सर्फराज हबीब शेख, साहिल जलील शेख, आदिल जलील शेख ( सर्व रा. जेऊर बायजाबाईचे ) हे फिर्यादीच्या घरी हातात लाकडी दांडके, लोखंडी रॉड, लोखंडी फायटर व दगड घेऊन आले. आणि फिर्यादी, त्याचा भाऊ व आईस शिवीगाळ करुन बळजबरीने घरात घुसले व तिघांना मारहाण केली. 

मुजफ्फर शेख याने लाकडी दांडक्याने डोक्यात मारले, साहिल शेख याने लोखंडी फायटरने पाठीत मारले, तर आदिल शेख याने लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या डोक्याला, पायाला, पोटाला, हाताला मार लागला. त्यावेळी फिर्यादीची आई भांडण सोडवण्याकऱीता मध्ये आली असता तिला सरफराज शेख, मुनाफ शेख व इकबाल शेख यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करुन तिच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व कानातील सोन्याचे अर्धा तोळ्याचे टॉप्स बळजबरीने काढून घेतले. आणि लाथाबूक्क्यानी मारहाण केली. तसेच जाताना त्यांनी घरावर दगडफेक केली व आम्ही तुम्हाला मोहल्याचा राहून देणार नाही अशी धमकी दिली. या मारहाणीत तिघे जखमी झाले.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आवेज कुरेशी याने दिलेल्या फिर्यादीवरुन आठ जणांविरुद्ध बी एन एस 118 (1) 189 (2) 191 (3) 190, 74,119 ( 1) 333 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार आव्हाड हे करीत आहेत

0/Post a Comment/Comments