सोन्या-चांदीच्या दरात झाली मोठी घसरण, धक्कादायक कारण आले समोर; आजचा भाव किती?


 

मुंबई: 26 जुलै 2025 रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या किमतीत 1000 रुपयांची घसरण झाली. श्रावण सुरु झाल्यापासून सोन्याच्या किमतीत मोठे बदल दिसत आहे. सोन्याच्या किमती वारंवार घसरत आहे. दर दिवसा सोन्याच्या किमतीतील बदल हा ग्राहकांसाठी सुखावणार ठरत आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 99,930 रुपये / 10 ग्रॅम झाला आहे. आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 91,600 रुपये झाला आहे. सराफा बाजारात सोन्याची किमत ही 500 रुपयांनी कमी झाली आहे. आज सकाळी MCX, वर सोन्याचा दर हा 97,806 रुपये आहे. सोन्याच्या वायद्याची किमत ही 1000 रुपयांनी घसरली आहे. सोनं हे स्वस्ताईच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.

सोने आणि चांदीच्या किमती घसरण्यामागील पहिले आणि सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकेने फिलीपिन्स आणि जपानसोबत व्यापार करार केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमधील तणाव कमी झाला आहे आणि त्यांना वाटते की भविष्यातही असे व्यापार करार होऊ शकतात. गुंतवणूकदार केवळ अमेरिकेत होणाऱ्या व्यापार करारांवरच नव्हे तर मध्यवर्ती बँकांच्या निर्णयांवरही लक्ष ठेवून आहेत. असे मानले जाते की गुंतवणूकदार सोने विकू शकतात आणि इतर गुंतवणूक पर्याय निवडू शकतात, म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने आणि चांदीच्या किमती घसरत आहेत.

दर कमी झाल्याने सराफांना फटका; तरीही ग्राहकांनी फिरवली पाठ

सोलापूर : आषाढ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग सोने खरेदीसाठी शुभमुहूर्त असतानाही सराफ बाजारांकडे लोकांनी दुर्लक्ष केले आहे. एक लाख प्रतितोळा असलेले सोने 89 हजारांवर आले आहे. सोन्याच्या दरात पहिल्यांदाच एवढी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. तरीही नागरिकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. याचा फटका सोलापुरातील सराफ व्यापार्‍यांना बसला आहे.

चीन-अमेरिकेमध्ये चाललेल्या व्यापारी युद्धाचा मोठा फटका सोन्याच्या बाजाराला बसला आहे. यामुळे दोन दिवसात सोन्याच्या दरामध्ये कमालीची चढ-उतार होताना दिसत आहे. परिणामी शुभ मुहूर्त असतानादेखील ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली. अमावास्याचाही मोठा परिणाम सराफ बाजारावर झाला. एक लाखाचे सोने दोन दिवसांमध्ये 89 हजार प्रतितोळा आले. सोन्याचा तोरा उतरला तरीदेखील बाजारपेठेत शांतता दिसून आल्याचे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष शिरीष देवरमणी यांनी सांगितले.

गुरुवारी गुरुपुष्यामृत योग होता. सोने खरेदीसाठी शुभमुहूर्त होता. मात्र त्याचदिवशी अमावास्या असल्याने सराफ बाजारात कमी तेजी जाणवली. मंगळवार पेठेतील सराफ बाजारात महिलांची मोठी गर्दी होती. मात्र कमी कॅरेटच्या दागिन्यांची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून आला. बुधवारी सोने 1 लाख 20 हजार प्रतितोळा भाव होता. मात्र गुरूवारी त्यामध्ये कमालीची घट होऊन 99 हजार 800 रुपये प्रतितोळा भाव झाला. दुसर्‍या दिवशी शुक्रवारी पुुन्हा सोन्याचा तोरा कमी होत 89 हजार दोनशे रुपये प्रति तोळा भाव झाला. दोन दिवसात सोन्यांच्या दरामध्ये चढ-उतार होत आहे. प्रत्येक दिवस आणि प्रत्येक तासाला सोन्याचा भाव बदलत आहे. त्यामुळे सोने-खरेदी आणि गुंतवणूक करणार्‍यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुुळे ग्राहक मर्यादित असल्याचे सराफ व्यापार्‍यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments