खळबळजनक... नगर तालुक्यात चक्क बायकोच्या छळाला कंटाळून तरुणाने संपवले जीवन


नगर तालुका (प्रतिनिधी) – नवऱ्याने किंवा सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडलेल्या पहावयास मिळतात, मात्र नगर तालुक्यात या उलट एक घटना समोर आली आहे. बायकोने नवऱ्याचा मानसिक छळ केल्याने त्याने या त्रासाला कंटाळून घरातच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील रुईछत्तीसी गावात घडली आहे . आकाश विठ्ठल जगदाळे (वय २५, रा. रुईछत्तीसी ता.नगर) असे मयताचे नाव असून याप्रकरणी त्याची पत्नी स्नेहल आकाश जगदाळे हिच्या विरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मयत आकाश चे वडील विठ्ठल दामोदर जगदाळे (वय ५३, रा. रुईछत्तीसी, ता.नगर) यांनी फिर्यादी दिली आहे. फिर्यादी यांचा मुलगा आकाश याचे लग्न १३ फेब्रुवारी २०२४ रोजी आष्टी तालुक्यातील एकशिंगे चिंचोली येथील स्नेहल हिच्याशी झाले होते. लग्न झाल्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर त्याची पत्नी स्नेहल हिने घरगुती किरकोळ वादाच्या कारणावरुन, तसेच पैशाची मागणी करुन, पतीशी वाद घालून मी तुझी समाजात चव घालून टाकेल. तुझी इज्जत ठेवणार नाही. तू काही माझा मालक नाही. मी वाटेल तसे वागेल. असे म्हणून सातत्याने मानसिक छळ केला. 

या छळाला कंटाळून आकाश याने १ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ५.४५ च्या सुमारास राहत्या घराच्या छताला लेडीज स्कार्पच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश यास आत्महत्या करण्यास त्याच्या पत्नीने प्रवृत्त केले असे फिर्यादी यांनी सोमवारी (दि.११ ऑगस्ट) दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी विठ्ठल जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन स्नेहल जगदाळे हिच्या विरुद्ध बी एन एस कलम १०८ प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत धुमाळ हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments