अहिल्यानगर
- अहिल्यानगर शहारात सोमवारी (दि. २९) सकाळपासून
धार्मिक तणाव निर्माण झालाय... तो कशामुळे तर ४ वेगवेगळ्या घटनांमुळे, या घटना
कोणत्या? हे सविस्तर पाहूयात. ही माहिती खुद्द जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे
यांनी विस्तृतपणे माहिती संकलित करून दिलेली आहे.
घटना क्र. १- आज दिनांक २९.०९.२०२५ रोजी सकाळी ०७.०० वा दुर्गा माता दौड ही इम्पेरिअल चौक ते मंगलगेट देवी मंदिर अशी नियोजित होती. सदर दुर्गा माता दौड मार्गावर बारतोटी कारंजा माळीवाडा या ठिकाणी श्रीमती आरती संग्राम रासकर व संग्राम आसाराम रासकर दोघे रा बारातोटी कारंजा, माळीवाडा, अहिल्यानगर यांनी दुर्गा माता दौडचे स्वागत करण्यासाठी रस्त्यात रांगोळी काढली व त्या रांगोळी मध्ये आय लव्ह महंम्मद हे नाव लिहीले होते. सदरची घटना लक्ष्यात आल्यानंतर तात्काळ रांगोळी काढुन टाकण्यात आली. त्याच दरम्यान कोणीतरी अज्ञात लोकांनी त्याचा व्हीडीओ काढुन मुस्लीम समाजाचे लोकांना प्रसारीत केला. त्यामुळे मुस्लीम समाजाचे लोकांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे एकत्र येवुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यांनतर समाजावुन सांगितले व कोतवाली पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे शेख अल्तमश सलिम जरीवाला (रा पारशाहखुंट अहिल्यानगर) यांचे फिर्यादीवरुन गुन्हा रजि ८७३/२०२५ भारतीय न्याय संहिता २९९,३ (५) प्रमाणे दाखल करण्यात आला. त्यावरुन आरोपी नामे संग्राम आसाराम रासकर रा बारातोटी कारंजा, माळीवाडा, अहिल्यानगर यास तात्काळ अटक करण्यात आलेली आहे.
घटना क्र. २- सदर दरम्यान मुस्लीम समाजाचे काही युवक हे पोलीस स्टेशन समोर आले त्यावेळी पोलीस स्टेशन समोरील चौकात श्री प्रविण संजय खराडे रा माळीवाडा ता कर्जत जि अहिल्यानगर हे त्यांचे मोटार सायकलची चावी बनविण्यासाठी उभे होते. त्यावेळी काही मुस्लीमांनी हाच तो असे म्हणुन त्यांचेवर धावुन जावुन त्यास मारहाण केली सदर वेळी बंदोबस्ताचे पोलीस यांनी हस्तक्षेप करुन त्यास ताब्यात घेतले व पोलीस स्टेशनला आणले व जमाव पांगविण्यात आला त्यांनतर सदर इसम प्रविण खराडे यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ८७४/२०२५ भा न्याय संहिता १८९ (२) ,१९०,१९१(२),११८(१),११५(२), ३२४ (२), ३५१(२) (३),३५२ प्रमाणे अनोळखी १० ते १५ मुस्लीम युवकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना क्र. ३ - तसेच दिनांक २९/०९/२०२५ रोजी सकाळी ०७.३० ते ०८.०० वा. दरम्यान कोतवाली पोलीस स्टेशन हददीत शिवप्रतिष्टान हिंदुस्तान यांचे वतीने आयोजित श्री दुर्गा माता दौड मार्गावर माळीवाडा केवळ हॉस्पीटल ते बुरुडगल्ली बॉम्बे बेकरी जवळ हाडाचे तुकडे व मासाचे तुकडे टाकल्याचे दिसल्याने हिंदु धर्मीयांचे भावना दुखावल्याने देविदास भिमराव मुदगल रा. गाडगीळ पटांगण अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुरनं ८७५/२०२५ भा.न्या.सं. कलम २९९, ३ (५) प्रमाणे अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
घटना क्र. ४ - सकाळचे घटनेनंतर सकाळी ११.१५ वा. सुमारास अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर जाणारे रोडवर फलटण चौकी समोर कोठला अहिल्यानगर येथे १५०-२०० लोकांनी कोणतीही पूर्व कल्पना न देता विना परवाना बेकायदेशीरपणे जमाव जमवुन रास्ता रोको आंदोलन सुरु केले. सदर ठिकाणी बेकायदा जमलेल्या जमावास मा. अपर पोलीस अधीक्षक साो. अहिल्यानगर श्री. वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग श्री. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक श्री. आनंद कोकरे यांनी वारंवार सुचना देवुन त्यांना कोतवाली येथे घडलेल्या घटनेबाबत गुन्हा दाखल असुन आरोपीतास अटक केल्याची माहिती दिली तरी ही तेथे जमलेल्या जमाव हा ऐकन्याच्या मनस्थितीत नव्हता व त्यांनी जवळ पास तेथे एक ते दिड तास रास्ता रोको सुरु ठेवले. बेकायदा जमलेला जमाव अचानक बेकाबु होवुन इदगाह मैदानचे दिशेने धावत त्यांनी त्यांचे हातात दगडे घेवुन पोलीसांनविरुध्द घोषणा देवून दगडफेक करुन जमाव दगडफेक करत पळत जावुन त्यांनी उभा असलेली रिक्षा, मोटर सायकलवर दगड फेक करुन नुकसान केले जमावाला थांबविण्याचे प्रयत्न सर्व पोलीस करीत असतांना जमाव काहीएक ऐकत नव्हता व त्यांनी पोलीसांवर देखील दगडफेक करुन पोलीसांना जखमी करुन पोलीस बजावत असलेले रास्ता रोको बंदोबस्ताचे सरकारी कामात अडथळा आणला. पुढील काही अनुचित प्रकार घड्डु नये याकरीता पोलीसांनी बेकायदा जमलेल्या १५० ते २०० जमावावर बळाचा वापर करुन लाठचार्ज केला. त्यावरुन तेथे जमलेला जमाव पळुन गेला व जमावातील काही आरोपीतांस ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच सी.सी.टी.व्ही. फुटेज, गोपनीय माहिती व माहितीगार इसम यांचेकडुन माहिती घेवुन तोफखाना पोलीस स्टेशन येथे पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत. या प्रकरणी मुस्लीम समाजाच्या सुमारे १६० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील ३९ जणांची नावे निष्पन्न झाली असल्याचे पोलीस अधिक्षक घार्गे यांनी सांगितले आहे.
तरी, वरील घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने मा.
पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर श्री सोमनाथ घार्गे यांचे
अध्यक्षते खाली हिंदु व मुस्लीम समाजातील प्रतिष्ठीत नागरीक व शांतता समिती सदस्य
यांची बैठक घेवुन अहिल्यानगर शहरामध्ये शांतता ठेवुन कायदा व सुव्यवस्था अबाधित
राखण्याबाबतचे आवाहन करण्यात आले असुन शहरामध्ये संवेदनशील ठिकाणी व मिश्र वस्ती
अशा ठिकाणी फिक्स पॉईंट, पेट्रोलिंग नेमण्यात आलेली आहे व
अहिल्यानगर शहरामधील महत्वाचे ठिकाणी रुट मार्च घेण्यात आलेला आहे. तसेच मा.विशेष
पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी घटनास्थळी भेट देवुन लोकांना
शांतता राखण्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आवाहन केले आहे.
Post a Comment