पारनेर - तरुणाने वारंवार फोन करून त्रास दिल्याने तसेच पैशांची मागणी केल्याने या त्रासाला कंटाळून नर्सिंग कॉलेजच्या २१ वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या रूम मध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना भाळवणी (ता.पारनेर) येथे घडली आहे. रोशनी अरुण तेलगुटे (रा. गाडगेनगर, मुर्तीजापूर, जि. अकोला) असे मयत तरुणीचे नाव असून तिला त्रास देणारा हर्षदीप ताटके (रा. चिखली, ता. मुर्तीजापूर, जि. अकोला) याच्या विरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मयत रोशनी हिचे वडील अरुण गंगाराम तेलगुटे (वय ५७, रा. गाडगेनगर, मुर्तीजापूर, जि. अकोला) यांनी ३१ ऑगस्ट रोजी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची मयत मुलगी रोशनी ही सन २०२३ पासून विजया स्कुल ऑफ नर्सिंग कॉलेज, भाळवणी, ता. पारनेर येथे नर्सिंग चे शिक्षण घेत होती. तिने २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.५५ वाजण्याच्या सुमारास तिच्या वडिलांना फोन करून मला १५ हजार रुपये पाठवा असे म्हणाली, त्यावर त्यांनी पाठवतो असे सांगितले. त्यानंतर रात्री ७.०८ वाजण्याच्या सुमारास त्यांना भाळवणी वरून एकाने फोन करून तुमच्या मुलीने आत्महत्या केल्याचे सांगितले.
त्यामुळे फिर्यादी हे त्यांचा मुलगा व नातेवाईकांना घेवून तातडीने भाळवणी कडे निघाले. २६ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता ते तेथे पोहोचले, व त्यांनी मयत रोशनी हिच्या रूम मध्ये राहणाऱ्या तिच्या मैत्रिणींकडे विचारपूस केली असता त्यांनी रोशनी हिच्या सोबत हर्षदीप ताटके हा तरुण गेल्या १५ -२० दिवसांपासून भांडण करत होता, तिला पैशांची मागणी करत होता. तसेच तिचा फोन व्यस्त लागला म्हणून तिच्यावर संशय घेवून तिला त्रास देत होता. त्यामुळे ती खूप तणावात होती, अभ्यासही करत नव्हती अशी माहिती दिली. याच मुलाने रोशनी ही १० वी मध्ये शिकत असताना तिला त्रास दिला होता. त्यावेळी त्याच्या वडिलांना रोशनीच्या वडिलांनी समजावून सांगण्यास सांगितले होते. तरीही त्याने पुन्हा तिला त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याची फिर्याद मयत रोशनीच्या वडिलांनी ३१ ऑगस्ट रोजी दिल्याने पोलिसांनी हर्षदीप ताटके याच्या विरुद्ध बीएनएस कलम १०८ नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा ....
'टीप टीप बरसा पाणी'वर गौतमी पाटीलच्या मनमोहक अदा, स्विमिंग पूलमधील व्हिडीओ केला शेअर
Post a Comment