नगर - विधानसभा
निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांत 289 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. दाखल अर्जांची बुधवारी छाननी प्रक्रिया पार
पडली. त्यातील फक्त 30 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले असून 259 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविले आहे. पात्र उमेदवारांची यादी त्या-त्या
मतदारसंघात प्रसिध्द करण्यात आली होती. गुरूवारी माघारीच्या पहिल्या दिवशी राहुरी
मतदारसंघातून दोघांनी तर कर्जत-जामखेड मतदारसंघात 1 अशा तीन
उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामुळे 12 मतदारसंघांत अजून 286 उमेदवार निवडणूक रिंगणात असून आता सर्वांच्या नजरा 4 नोव्हेंबरच्या माघारीच्या शेवटच्या दिवसाकडे लागल्या आहेत.
माघारीच्या पहिल्या दिवशी
कर्जमधून रोहित सुरेश पवार (रा. सुपे, बहिरोबावाडी, ता. कर्जत) यांनी माघार घेतली आहे. तर राहुरीतून अरुण बाबूराव तनपुरे (रा.
तनुपरे गल्ली, राहुरी) आणि नानासाहेब पंढरीनाथ जुंधारे (रा.
मांजरी, ता. राहुरी) अशा तीन उमेदवारांनी माघार घेतली आहे.
Post a Comment