अहिल्यानगर जवळ चक्क माजी आमदारांच्या शेतात पालं ठोकून मारला ‘ताबा’


अहिल्यानगर - माजी आमदारांच्या शेताची संरक्षक भिंत तोडून अनाधिकाराने शेतात प्रवेश करत पालं ठोकून अतिक्रमण केल्याची घटना नगर तालुक्यातील पोखर्डी गावच्या शिवारात घडली आहे. याबाबत विचारणा करायला गेलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी करत पैशांची मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणी ३ ते ४ अनोळखी महिलांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माजी आमदार नरेंद्र मारुतराव घुले (वय ६५, रा. दहीगावने, ता.शेवगाव) यांनी फिर्याद दिली आहे. घुले यांची पोखर्डी गावच्या शिवारात शेतजमीन आहे. या शेतजमिनीला त्यांनी संरक्षण भिंतही बांधलेली आहे. काही अनोळखी व्यक्तींनी ती संरक्षण भीत एका ठिकाणी फोडून शेतात अनाधिकाराने प्रवेश करत तेथे दोन पाल ठोकत त्या ठिकाणी राहात आहेत. ही बाब त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या महिलांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ दमदाटी करत पैशांची मागणी केली. पैसे दिल्या शिवाय आम्ही येथून जाणार नाही असे त्या महिला म्हणाल्या.

ही बाब कर्मचाऱ्यांनी घुले यांना सांगितली. त्यानंतर घुले यांनी १६ ऑक्टोबर रोजी तेथे जावून पाहणी केली आणि १७ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अनोळखी ३ ते ४ महिलांच्या विरुद्ध बीएनएस कलम ३३३, ३२४ (), ३५२, ३५१ () प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.    

0/Post a Comment/Comments