नगर - दोन दिवसांपूर्वी खारे कर्जुने येथे पाच वर्षाच्या मुलीला कालच बिबट्याने ठार केले होते.आज शुक्रवारी संध्याकाळी साडे सहा च्या सुमारास निंबळक येथील कोतकर वस्ती वरील राजवीर रामकिसन कोतकर या आठ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. पण या हल्ल्यातून मुलगा बालबाल बचावला पण गंभीर जखमी झाला आहे.
अहिल्या नगर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढत आहे. तालुक्यातील बहुतांश सर्वच गावात बिबट्याचे दर्शन घडत आहे. अनेक ठिकाणी आजवर बिबट्याने कुत्रे ,बकऱ्या , गाई यांच्यावर हल्ले केले आहेत.पण आता बिबटे मानवी वस्तीत.घुसून माणसांवर हल्ले करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच खारे कर्जुने येथील रियांका सुनील पवार या पाच वर्षांच्या मुलीला सायंकाळी साडे सहा च्या सुमारास तिच्या पालकांच्या डोळ्यादेखत बिबट्याने पळवून नेले होते. तब्बल 16 तासांनी तिचा अर्धवट मृतदेह सापडला होता. त्या बिबट्याला तातडीने जेरबंद करावे या मागणीसाठी खारे कर्जुने ग्रामस्थांनी गाव बंद ठेवले होते.
ही घटना ताजी असताना आज त्याच परिसरात निंबळक येथील वैष्णव माता
मंदिर परिसरात असणाऱ्या कोतकर वस्तीवरील राजवीर रामकिसन कोतकर वय आठ वर्षे वयाच्या
मुलावर बिबट्याने हल्ला केला. हा मुलगा सायंकाळच्या सुमारास खेळत असताना बिबट्याने
त्याच्यावर हल्ला केला. नशीब बलवत्तर म्हणून तो मुलगा.त्याच्या तावडीतून सुटला
पण गंभीर रित्या जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी अहिल्यानगर मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने कोतकर वस्ती , निंबळक गाव आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन दिवसांपूर्वीची खारे कर्जुने येथील दुर्दैवी घटना ताजी असतानाच आज निंबळक येथील राजवीर कोतकर या मुलावर बिबट्याने हल्ला केला. हा बिबट्या आजवर खारे कर्जुने,निंबळक, इसळक , हिंगणगाव अशा परिसरात विविध ठिकाणी आढळून आला आहे. या नरभक्षक बिबट्याचा विषय प्रशासनाने आता गांभीर्याने घेतला पाहिजे. ड्रोन,सीसीटीव्ही च्यामाध्यमातून शोध घेऊन त्याला ठार मारणे गरजेचे आहे... डॉ.दिलीप पवार माजी.उपसभापती नगर पंचायत समिती

Post a Comment