नगर तालुका (प्रतिनिधी) - ओढ्यातील रस्त्यावरून जाणारी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने रस्ता खोदण्यावरून आणि मुरूम टाकण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना नगर तालुक्यातील निमगाव वाघा शिवारात निमगाव फाट्यावर ६ सप्टेंबर रोजी दुपारी ४.१५ च्या सुमारास घडली. यावेळी एकमेकांवर तलवार, कोयते, सत्तूरने वार करण्यात आले, तसेच लोखंडी रॉडनेही मारहाण करण्यात आली, यामध्ये ६ जण जखमी झाले असून दोन्ही गटाच्या १८ व ४-५ अनोळखी लोकांवर खुनाचा प्रयत्न केल्याचे २ वेगवेगळे गुन्हे नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
जखमींमध्ये एका गटाचे छबुराव राणुजी कांडेकर व निखील छबुराव कांडेकर (दोघे रा. हमीदपूर, ता.नगर) तर दुसऱ्या गटाचे दिलावर खलील शेख, अल्ताफ खलील शेख, इरफान रशीद शेख, अरबाज रफीक शेख (सर्व रा. शेख वस्ती, निमगाव वाघा, ता.नगर) यांचा समावेश आहे. याबाबत छबुराव कांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून दिलावर खलील शेख, अल्ताफ खलील शेख, इरफान रशीद शेख, अरबाज रफीक शेख, सादिक मोहम्मद शेख, राजू रशीद शेख, सोहेल रशीद शेख, रशीद मोहम्मद शेख (सर्व रा. शेख वस्ती, निमगाव वाघा, ता.नगर), संदीप माधव खेसे (रा.जखणगाव, ता.नगर), संतोष माधव खेसे (रा. हमीदपूर, ता.नगर) यांच्या विरुद्ध बीएनएस कलम १०९, १८९ (२), १९१ (२), १९१ (३), १९०, ११५ (२), ३५२, ३५१ (२)(३), ३ (५), १२६ (२), आर्म अॅक्ट ४/२५, मुंबई पोलिस अधिनियम ३७ (१)(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दिलावर खलील शेख ( रा. शेख वस्ती, निमगाव वाघा, ता.नगर) यांच्या फिर्यादी वरून छबुराव राणुजी कांडेकर, निखील छबुराव कांडेकर, किरण छबुराव कांडेकर, राहुल गणेश कांडेकर, बाळासाहेब कांडेकर, सुजित कांडेकर व ३ ते ४ अनोळखी इसम (सर्व रा. हमीदपूर, ता.नगर) तसेच योगेश पिसे व रवि नरवडे(दोघे रा. टाकळी खातगाव, ता.नगर) यांच्या विरुद्ध बीएनएस कलम १०९, १८९ (२), १९१ (२), १९१ (३), १९०, ११५ (२), ३५२, ३५१ (२)(३), ३ (५), १२६ (२), आर्म अॅक्ट ४/२५, मुंबई पोलिस अधिनियम ३७ (१)(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करीत आहेत.
हे ही वाचा ...
कला केंद्रातील एका नर्तिकेच्या प्रेमात बुडालेल्या उपसरपंचाची आत्महत्या

Post a Comment