मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून
पावसाने दडी मारली आहे. पाऊस जणू काही राज्यावर रुसून बसला आहे. पाऊस पडत नसल्याने
राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. सप्टेंबर महिन्याची 20 तारीख
उजाडली तरी पाऊस न पडल्याने दुष्काळाचे भयावह संकट शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभे
राहताना दिसत आहे. अशा या परिस्थितीत हवामान तज्ज्ञ यांनी शेतकऱ्यांना आशेचा किरण
ठरेल असा हवामान अंदाज वर्तवला आहे. यंदा ज्या भागांमध्ये जास्त पाऊस पडला नाही
तिथे आता मोठा पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. राज्यात
कोकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली
आहे.
"20 तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर
वाढणार आहे. 20 ते 24 सप्टेंबरपर्यंत पाऊस पडणार आहे.
पुढच्या चार दिवसांत दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात
चांगल्या पावसाची शक्यता आहे. यामध्ये नांदेड, यवतमाळ, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, लातूर, बीड, परभणी, जालना, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर
आणि कोकण पट्ट्यामधील जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे
ओढे-नाले भरुन वाहणार आहेत", असा दावा पंजाबराव डख यांनी वर्तवला
आहे.
उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडणार की नाही?
"उत्तर महाराष्ट्रात नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर
या जिल्ह्यांमध्ये भाग बदलून विखुरलेल्या स्वरुपाचा पाऊस 20 तारखेला
पडेल. त्यानंतर 21 ते 24 तारखेच्या दरम्यान दमदार पावसाची
शक्यता आहे", असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला
आहे.
"पश्चिम
महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण
किनारपट्टी या भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. पुढच्या चार दिवसांत कोकण
किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण
महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, गेवराई, नांदेड, हिंगोली, वाशिम, छत्रपती
संभाजीनगर, यवतमाळ या भागांमध्ये 24 तारखेपर्यंत
चांगल्या जोराचा पाऊस पडणार आहे.
दक्षिण महाराष्ट्रात सोलापूर, धाराशिव आणि बीड, आष्टी, कर्जत, जामखेड, पाथर्डी, श्रीगोंदा, पाटस, बारामती
या भागांमध्ये पाऊस पडलेला नाही. पण पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, 24 तारखेपर्यंत
या भागांमध्ये पाऊस पडणार आहे. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा, पंढरपूर, जत, आटपाडी, सांगोला
या परिसरात चांगला पाऊस असणार आहे. तसेच तुळजापूर, नळदुर्ग या परिसरात देखील चांगला पाऊस
असणार आहे.
कोणकोणत्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे?
सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती
संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, जालना, वाशिम, हिंगोली, यवतमाळ
या जिल्ह्यांमध्ये 20 ते 23 सप्टेंबर चांगला पाऊस पडेल. अचानक
वातावरणात बदल होईल आणि चांगला पाऊस पडेल, असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला
आहे.

Post a Comment