नगर - चांगल्या आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील अॅथलेटिक्स अॅकॅडमीच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुलांसाठी व मुलींसाठी अॅथलेटिक्स मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्ण देशभरातील स्पर्धक सहभागी झाले होते.
खडकी ते सारोळा कासार रस्त्यावर ५ किलोमीटर अंतरात झालेल्या या स्पर्धेत मुलींमध्ये शाहीन (उत्तरप्रदेश), अंजली पंडित (हरियाणा), अंजली यादव (उत्तरप्रदेश), संयुक्ता गारडे (अहिल्यानगर) यांनी प्रथम चार क्रमांकाची पारितोषिके जिंकली. तर मुलांच्या स्पर्धेत करण सरवदे (सांगली), सौरभ मेहरा (हरियाणा), रोहित बिन्नर (नाशिक), विनीत कुमार (उत्तरप्रदेश) यांनी पारितोषिके जिंकली.
सदर दोन्ही स्पर्धांची रोख पारितोषिके ही माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, शेतकरी पुत्र राहुल बहिरट, ग्रामपंचायत सदस्य रोहित काळे, उद्योजक निखील धामणे, उद्योजक ऋषिकेश काळे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष नानासाहेब पारधे, उद्योजक रवी कडूस, उद्योजक सागर कडूस यांच्या वतीने देण्यात आली. विजेत्यांना ट्रॉफी आकाश कडूस, अमोल झरेकर यांच्या वतीने देण्यात आल्या. या स्पर्धेसाठी अॅथलेटिक्स अॅकॅडमीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. ग्रामीण भागात प्रथमच अशी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

Post a Comment