गुंडेगावात मध्यरात्री थरार...पती-पत्नीला मारहाण करत रोख रक्कमेसह दागिने लंपास


नगर तालुका (प्रतिनिधी) - रात्री घरात झोपलेल्या वृद्ध दाम्पत्यास बेदम मारहाण करत ७० हजार रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने तिघा चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना गुंडेगाव (ता.नगर) येथील हराळ मळा येथे १ ऑगस्ट रोजी पहाटे घडली. दत्रात्रय त्रिंबक हराळ (वय ७०) व त्यांच्या पत्नीला ही मारहाण करण्यात आली.

तिघा चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा वाजवला. हराळ यांनी दरवाजा उघडला असता चोरटे घरात घुसले व त्यांनी दोघांना मारहाण करत ऐवज लुटून नेला. हराळ यांनी शुक्रवारी (दि.३१) बँकेतून ७० हजारांची रोकड काढून आणली होती. तिच्यासह सुमारे ३ ते साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविले. 

या घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, नगर ग्रामीण चे पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने, नगर तालुका पोलीस ठाण्याचे स.पो.नि. गणेश वारुळे यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली.

0/Post a Comment/Comments