अहिल्यानगर
: नगर ते दौंड हायवेवरील हिवरेझरे (ता.नगर) शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत
बसलेल्या एका सराईत टोळीवर नगर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोघांना ताब्यात
घेतले असून त्यांच्याकडून कोयता, मिरची पावडर, मोबाईल व इतर साहित्यासह ३० हजार ६२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तर तीन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, १४
ऑक्टोबर रोजी रात्री ११:३५ वाजेपासून ते १५ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ४:०२ वाजेच्या
सुमारास नगर ते दौंड जाणारे हायवे रोडलगत, शिवनेरी मंगल
कार्यालयजवळ, हिवरेझरे (ता. नगर) येथे ही घटना घडली. या परिसरातील एका मोठ्या आकाराच्या वडाच्या झाडाच्या खोडाच्या आडोशाला
अंधारात काही इसम दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसले होते.
पोलिसांनी
मायाभाई उर्फ लक्ष्मण अशोक वाघ (वय २८, रा.
शिराढोण, ता. नगर) आणि लाडू उर्फ अमोल दत्तात्रय कासार (वय
२६, रा. गुंडेगाव, ता. नगर) या दोन
आरोपींना पकडले आहे. तसेच त्यांच्यासोबत असलेले पप्पु उर्फ
आदिनाथ शरद पवार (रा. चिखली कोरेगाव, ता. श्रीगोंदा), भाई उर्फ दिपक मुरलीधर घायमुक्ते (रा. देऊळगाव सिद्धी, ता. नगर) आणि ५) एक अनोळखी इसम हे तीन आरोपी फरार झाले आहेत.
आरोपींनी
दरोडा टाकण्याच्या उद्देशाने लोखंडी कोयता, कापडी
मास्क, लोखंडी पाईप, मिरची पावडर,
एक विवो मोबाईल आणि एक रेडमी मोबाईल असा एकूण ३०,६२४ रुपये किमतीचा मुद्देमाल स्वतःच्या कब्जात बाळगला होता. या सर्व साहित्यासह पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले आहे. याप्रकरणी त्यांच्या विरुद्द पो.कॉ.सागर मिसाळ (वय ३६, नेमणूक- नगर तालुका पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) प्रमाणे गुन्हा
नोंदवण्यात आला आहे.
सदर
कारवाई नगर तालुका पोलीस ठाण्याचे स.पो.नि. गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात
आली असून, या प्रकरणाचा पुढील
तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे करत आहेत.
हे ही
वाचा ...
सेवा संकल्प अभियानातून २७३ अति तीव्र कुपोषित बालकांच्या पोषणाची जबाबदारी अधिकाऱ्यांकडे
अहिल्यानगरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु, ‘या’ ठिकाणाहून आले आहेत १०० भावी डॉक्टर

Post a Comment