अहिल्यानगर - शहरातील केडगाव परिसरातील दिपनगर भागात एका घरात सुरू
असलेल्या वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर कोतवाली पोलीस आणि दक्षिण कमांड लष्करी
गुप्तचर विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई केली आहे. या धडक कारवाईत एक बांगलादेशी
महिला, तिचा
पती आणि एका संशयितासह अनैतिक व्यापाराचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी
कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर २०२६ रोजी कोतवाली पोलीस
ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गोपनीय बातमी मिळाली होती की, केडगाव
येथील दिपनगर भागात एक महिला काही महिलांना वेश्याव्यवसायासाठी जागा उपलब्ध करून
देत असून, ग्राहकांकडून पैसे घेऊन आपली उपजीविका
भागवत आहे. याच दरम्यान दक्षिण कमांड लष्करी गुप्तचर विभाग, अहिल्यानगर
हे सुद्धा याच माहितीच्या आधारे समांतर काम करत होते.
या दोन्ही यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवून दुपारी १५:४०
वाजता दिपनगर, केडगाव येथील संबंधित ठिकाणावर छापा
टाकला. या
छाप्यात सईदा अफसर खान (वय ५४ वर्षे, रा. झेंडा चौक, केडगाव, अहिल्यानगर)
आणि छोटुराम नारायण रायजी (वय ७० वर्षे, रा. केडगाव, अहिल्यानगर)
हे दोघे व एक पीडित महिला तेथे मिळून आले. प्राथमिक चौकशीमध्ये संबंधित पीडित
महिला ही बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात स्त्रियांचे अनैतिक
व्यापारास प्रतिबंधक अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५, ७, ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. पोलिसांनी
पीडित महिलेकडे अधिक सखोल चौकशी केली असता, सातपुते डेअरी जवळ राहत असलेला तिचा
नवरा एम. डी. टुटुल मुल्ला (वय ३७ वर्षे, रा. पाईग्राम, पोलीस
स्टेशन ता. कुलना, जिल्हा कुलना, बांगला
देश) हा सुद्धा अहिल्यानगरमध्ये असल्याचे व तो या प्रकारात असल्याचे समोर आले. लष्करी
गुप्तचर विभागाच्या सहकार्याने या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे.
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर
पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या
मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस
उपनिरीक्षक गणेश देशमुख, सफौ सुनील शिरसाट, पोलीस
हवालदार संतोष लगड, राहुल शिंदे, बाळकृष्ण
दौंड, पोलीस
नाईक वर्षा पडीत आणि पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले, सुरज कदम, दत्तात्रय
कोतकर, शिरीष
तरटे, संदीप
कव्हळे, सचिन
लोळगे, सत्यम
शिंदे, चालक
पोकों पोटे, महिला पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी रोहकले
तसेच मोबाईल सेलचे पोकों राहुल गुंडू यांनी पार पाडली. या
कारवाईमध्ये लष्करी गुप्तचर विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले असून, यापूर्वी
जून २०२५ मध्ये एमआयडीसी अहिल्यानगर येथेही लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने अशा
प्रकारच्या कारवाई केल्या आहेत.

Post a Comment