भाजपाचे मंत्री नितेश राणेंवर अहिल्यानगर मध्ये गुन्हा दाखल, ‘हे’ आहे कारण...


अहिल्यानगर - दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणारे तसेच मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी भाजपाचे कणकवली मतदार संघाचे आमदार व राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश नारायण राणे यांच्या विरुद्ध अहिल्यानगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात २५ सप्टेंबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मोहम्मद युनुस मोहम्मद युसुफ पटेल (वय ४७, रा अवस्थीनगर, नागपूर) यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये म्हंटले आहे की, ९ सप्टेंबर रोजी श्रीरामपूर येथे शिवाजी चौकात रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ झालेल्या सभेत मंत्री नितेश राणे यांनी मुस्लिम समजाबद्दल चिथावणीखोर वक्तव्य केले. हमारे रामगिरी महाराज के खिलाफ किसीने मस्ती की, तो तुम्हारे मस्जीदो के अंदर आ कर एक एक को चून चून के मारेंगे अशी जाहीर धमकी दिली.

त्यांच्या या चिथावणीखोर वक्तव्यामुळे हिंदू व मुस्लिम समाजात जातीय तेढ व द्वेष निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच या वक्तव्याने मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी मंत्री नितेश राणे यांच्या विरुद्ध बीएनएस कलम १९६, २९९, ३०२, ३५३ () प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments