अहिल्यानगरमध्ये सीना नदी पुलावर स्कूल व्हॅन पलटी होऊन भीषण अपघात


अहिल्यानगर - शाळेतील विद्यार्थ्यांना ने आण करणाऱ्या स्कूल व्हॅनला नगर पुणे महामार्गावर सीना नदीच्या पुलावर ६ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात व्हॅन पलटी होऊन चालक गंभीर जखमी झाला. तसेच वाहनाचे मोठे नुकसान झाले. यावेळी व्हॅन मध्ये शालेय विद्यार्थी नसल्याने सुदैवाने मोठी हानी टळली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की सारसनगर येथील सुनील पांडे हा त्याची स्कूल व्हॅन (क्र. एम एच १६ बी सी ९९२) घेऊन केडगाव येथे शालेय विद्यार्थी आणण्यासाठी जात असताना सीना नदीत पूलावर आल्यानंतर अचानक व्हॅन वरील नियंत्रण सुटल्याने व्हॅन पूलाच्या कठड्याला धडकून पलटी झाली. या अपघातामध्ये व्हॅन चालक सुनील पांडे याच्या पायाला व हाताला गंभीर मार लागल्याने तो जखमी झाला. अपघात होताच घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी पलटी झालेली व्हॅन सरळ करुन चालक पांडे यास तेथून जवळच असलेल्या पॅसिफिक हॉस्पिटल येथे उपचाराकरीता नेले. परंतु तेथील डॉक्टरांशी चर्चा करुन पांडे यास श्रीदीप हॉस्पिटल येथे उपचाराकरिता दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

0/Post a Comment/Comments