पारनेर
: अहिल्यानगर-पुणे महामार्गावर वाघुंडे बुद्रुक गावाकडे वळताना कारला एसटी बसने
जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील मनोहर दादाभाऊ काळोखे (वय ५२, रा. पानोली) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही धडक इतकी भीषण होती, की एसटीने कारला पाठीमागून धडक
दिल्यानंतर कारमधील गॅस टाकी उडून बाहेर पडली आणि तिथे उभ्या असलेल्या दुचाकीवर
जाऊन आदळली.
मंगळवारी
( २९ जुलै) सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास मनोहर काळोखे हे त्यांच्या कारने
(क्र. एमएच १६-बीएच ३३५१) पुण्याहून नगरकडे जाणाऱ्या रस्त्याने येत होते. त्यांना
वाघुंडे बुद्रुककडेजायचे असल्याने त्यांनी रस्ता दुभाजकापासून कार वळविली. त्याच वेळी
नगरहून पुण्याकडे भरधाव वेगाने जात असलेल्या शिंदखेडा-पुणे बसने (क्र. एमएच
२०-बीएल ४१२३) कारला मागून जोराची धडक दिली. यामुळे काळोखे हे काचेवर आदळले गेले.
त्यात त्यांच्या मानेला, डोक्याला
जबर मार लागला.
काळोखे यांनी पुण्याकडे जाणारा रस्ता जवळपास ओलांडलाही होता. मात्र, भरधाव वेगाने आलेल्या एसटी बसच्या चालकाला अंदाज न आल्याचे कारला एसटी बसची जोराची धडक बसली. त्यात कारच्या पाठीमागच्या बाजूचा चक्काचूर झाला. जोराची धडक बसल्याने काळोखे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते कारच्या काचेवर आदळले गेले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिक नागरिकांनी सुपा येथील रुग्णालयात नेले, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
हे ही वाचा ...
रात्री झोपण्याआधी चावून खा किचनमधील हा हिरवा सुगंधी पदार्थ, होतील अनेक फायदे
Post a Comment