ओडीसातून आणलेल्या गांजाचा मोठा साठा शेंडी बायपासला पकडला, ८० लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त


अहिल्यानगर - ओडीसा राज्यातुन नगर जिल्ह्यात विक्रीसाठी आणलेल्या गांजाचा मोठा साठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला आहे. शेंडी बायपास रोडवर २९ ऑगस्ट रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली असून यात २ जणांना ताब्यात घेवून त्यांच्याकडील १२० किलो ९०५ ग्रॅम गांजासह मालट्रक असा ८० लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  

नगर जिल्ह्यात विविध अंमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे, संतोष खैरे, दिपक घाटकर, फुरकान शेख, लक्ष्मण खोकले, राहुल द्वारके, अमृत आढाव, आकाश काळे, रमिझराजा आतार, प्रकाश मांडगे, सागर ससाणे, भगवान धुळे, उमाकांत गावडे, अरुण मोरे, जयराम जंगले यांचे दोन विशेष पथके तयार केलेले आहेत. ही पथके अंमली पदार्थ विक्री व वाहतुक करणारे इसमांची माहिती काढत असताना २९ ऑगस्ट रोजी पो.नि. कबाडी यांना दोन इसमांनी ओडीसा राज्यातुन मोठ्या प्रमाणावर गांजा खरेदी करुन तो नगर जिल्ह्यात विक्री साठी घेवून येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

ही माहिती मिळताच त्यांनी पोलिस पथकांमार्फत शेंडी बायपास रोड वर सापळा लावला. काही वेळात संशयित ट्रक येताना पथकास दिसला, त्यांनी ट्रक थांबवून ट्रक मधील नवनाथ अंबादास मेटे (वय ३८, रा. ढोरजे, ता. श्रीगोंदा)   ज्ञानेश्वर दत्तात्रय फुंदे (वय ३१, रा. मळेगांव, ता. शेवगांव)यांना ताब्यात घेतले. त्यानंतर ट्रक ची पाहणी केली असता ट्रकचे केबीनवरील टपावर ६ गोण्यामध्ये ३० लाख २२ हजार ६२५ रुपये किमतीचा १२० किलो ९०५ ग्रॅम गांजा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी सदर गांजा व ट्रक असा ८० लाख ८३ हजार ४६४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडे सखोल चौकशी करता त्यांनी सदरचा गांजा हा त्यांचे २ साथीदारांचा  असुन तो विक्रीकरीता आणला असल्याचे सांगितले आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीविरुध्द पो.कॉ. प्रकाश मांडगे यांच्या फिर्यादीवरुन एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन १९८५ चे कलम ८ (), २० () ii () अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचे ताब्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा मिळुन आलेला असुन सदर गांजा तस्करीची व्याप्ती मोठ्या प्रमाणामध्ये असल्याने पोलीस अधीक्षक घार्गे यांचे आदेशाने गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला असुन पुढील तपास उपनिरीक्षक अनंत सालगुडे हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments