नगर तालुका (प्रतिनिधी)- सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण
केल्याच्या कारणास्तव नगर तालुक्यातील चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद खंडू पवार यांचे पद
जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी रद्द केल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य तथा
भारतीय जनसंसदचे जिल्हाअध्यक्ष सुधीर भद्रे यांनी दिली आहे. शरद पवार हे खा. निलेश
लंके यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित आहेत.
भद्रे यांनी सांगितले की, शरद खंडू पवार यांनी काही वर्षांपूर्वी चिचोंडी पाटीलच्या एस .टी . स्टँड वरील सार्वजनिक रस्त्यावर गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडप टाकला . मंडपामधे शहीद महेंद्रकुमार सुदाम नालकुल आणि कै.पैलवान रामरावदादा पवार यांचे फोटो लावून शरद खंडू पवार यांनी चिचोंडी पाटीलच्या ग्रामस्थांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला . गावातील लोकांना सदर मंडप गणेशोत्सवापुरताच राहील असे वाटले .मात्र पवार यांनी मंडप न काढता आणि सार्वजनिक रहदारीचा रस्ता रिकामा न करून देता तेथे पत्र्याचे मोठे शेड उभे करून हरी ओम रियल इस्टेट नावाने ऑफिस थाटले.
यासोबतच खरेदीखत नसलेल्या इनामाच्या
देवस्थानच्या जागेतच बांधलेल्या बंगल्याच्या समोर जाण्या येण्यासाठी कॉंक्रीटचा
रस्ता तयार केला .बंगल्याच्या मागील बाजूस शासनाच्या निधीतून तयार केलेल्या
रस्त्यावर जनावरांसाठी दावण बांधली .या दावणीला बांधलेल्या जनावरांमुळे गावकऱ्यांना
रहदारीसाठी अडथळा निर्माण व्हायचा. अशा प्रकारची तक्रार जिल्हाधिकाऱ्यान कडे लेखी स्वरूपात केली होती.
जिल्हाधिकारी यांनी
याची चौकशी करून सरपंच पवार यांचे पद रद्द केले आहे. यावेळी भद्रे यांच्या वतीने ॲड.
सचिन चांगदेव इथापे आणि त्यांचे सहकारी ॲड. रणजीत पांडुरंग ताकटे यांनीयुक्ती वाद
केला. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर आणि
पुरावे तपासून पाहिल्यानंतर सरपंच पवार यांचे पद अपात्र असल्याचा लेखी निकाल
दिल्याची माहिती सुधीर भद्रे यांनी दिली आहे .
Post a Comment