केडगावमध्ये शिक्षिकेच्या गळ्यातील मंगळसुत्र धुमस्टाईलने हिसकावून पळविले


अहिल्यानगर – पती सोबत दुचाकीवर चाललेल्या शिक्षिकेच्या गळ्यातील मंगळसुत्र पाठीमागून काळ्या रंगाच्या मोटारसायकल वर आलेल्या चोरट्याने हिसका मारून तोडत चोरून नेल्याची घटना केडगावच्या लिंक रोड वर कारमेल हायस्कुलच्या जवळ २८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत अर्चना संतोष चौधरी (वय ४९, रा. जिजामाता कॉलनी, भुषणनगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या शिक्षिका असून त्या २८ ऑगस्ट रोजी सकाळी आपल्या पतीच्या समवेत दुचाकीवर शाळेत जाण्यासाठी घरून निघाल्या होत्या. भुषण नगर कडून लिंक रोड कडे जात असताना कारमेल हायस्कूल जवळ त्यांच्या पाठीमागून एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर डोक्यात हेल्मेट घातलेला एक चोरटा आला. त्याने त्याची मोटारसायकल फिर्यादी यांच्या जवळ आणून अचानक त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावले, त्यावेळी फिर्यादी यांनी ते मंगळसुत्र पकडल्याने त्याचा अर्धा भाग चोरट्याच्या हाती लागला. तो सुमारे २५ हजार किमतीचा मंगळसुत्राचा अर्धा भाग घेवून चोरटा भरधाव वेगात पसार झाला.

या घटनेनंतर चौधरी यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अनोळखी चोरट्या विरुद्ध बीएनएसकलम ३०९ (४) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.  

0/Post a Comment/Comments