रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातून गुहागर तालुक्यातील शिक्षक आपल्या पत्नीसह हिंगोली येथे गावाला जाताना बेपत्ता तक्रार दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. गुहागर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह मूळ गावी हिंगोली येथे गणपतीसाठी मंगळवारी निघाले होते. गावी निघालेले या कुटुंबातील पती-पत्नी यांचा संपर्क तुटला त्यांचा कॉलही लागत नव्हता ते गावीही पोहोचले नाहीत त्यामुळे गावातील नातेवाईक गुहागर येथील मित्र मंडळी नातेवाईक हे सगळेच चिंतेत पडले.
दोन दिवस अवघी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली. मात्र आज गुरुवारी काही वेळापूर्वी गुहागर पोलीस ठाण्यात माहिती प्राप्त झाली असून हे कुटुंब गोंदवले येथील महाराजांच्या मठात सुखरूप असल्याची माहिती मिळाली आणि सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. ही माहिती संबंधित पोलीस यंत्रणेने गुरुवारी सकाळी च्या सुमारास गुहागर पोलिसांना दिली आहे. महाराजांच्या मठाबाहेर तो नंबर असलेली गाडी दिसली आणि त्यांचा तपास लागला ते सुखरूप असल्याचे स्पष्ट झाल्याने सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
या सगळ्याबाबत गुहागर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तिंनी आपण गोंदवले येथे मठात दोन दिवस थांबणार आहोत. याची त्यांनी कोणतीच कल्पना जवळच्या मित्रमंडळींना किंवा घरी नातेवाईकांनाही दिली नाही त्यामुळे दोन दिवस मोठा गोंधळ उडाला होता. अखेर त्यांच्या एका मित्रानेच गुहागर पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रारीची नोंद केली. त्यांची शोधाशोध सुरू झाली होती.
मंगळवारी (२६ ऑगस्ट) सायंकाळी ५ वाजता चिपळूण परिसरात असताना त्यांचा शेवटचा संपर्क झाला होता, त्यानंतर मात्र त्यांचे दोन्ही मोबाईल फोन बंद येत असल्याने कुटुंबाची चिंता वाढली होती. त्यांच्याबरोबर त्यांचे दोन लहान मुलं ही होती कार घेऊन ते निघाले होते त्यांच्या गाडीचा क्रमांक गाडीचा फोटो या सगळ्या कुटुंबाचे फोटो ही सगळी माहिती पश्चिम महाराष्ट्रातील सातारा पंढरपूर पोलीस यंत्रणेला माहितीसाठी देण्यात आले होते. गणेशोत्सवासाठी आपल्या कुटुंबासह गावी जाण्यासाठी चव्हाण गुरुजींनी गुहागरहून प्रवास सुरू केला होता. मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ते चिपळूणला पोहोचले होते. त्यानंतर त्यांचा फोन बंद येत होता. अद्यापही त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचे कुटुंबिय त्यांना शोधण्यासाठी हिंगोलीहून निघाले होते, त्यांनी मित्र आणि नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली आहे.
गुहागर पोलीस ठाणे लापत्ता रजिस्टर नं.15/2025 आज दिनांक -28/08/2025 रोजी 06.59 वा. दाखल करण्यात आला होता. ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण, पत्नी स्मिता ज्ञानेश्वर चव्हाण, मुले पियुष ज्ञानेश्वर चव्हाण शौर्य ज्ञानेश्वर चव्हाण हे दिनांक 26/08/2025 रोजी दुपारी 02.50 वा. मुलांना तसेच त्यांना स्वतःला गणपतीची सुट्टी असल्याने शृंगारतळी येथील घराला लॉक लावून त्यांचे गावी खिल्लार तालुका शेणगाव ,जिल्हा हिंगोली येथे जातो असे शेजारी राहणारे शशिकाला विश्वकर्मा यांना सांगून त्यांच्याकडे घराची चावी देऊन त्यांच्या बलेनो गाडीसह निघाले होते. त्यांची गाडी कुंभार्ली घाट माथा येथून सायंकाळी 05.16 वा. पुढे सातारा दिशेने पास झालेली सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये दिसत होती. परंतु पुढे त्यांची कार कुंभारली घाटमाथा येथून पुढे जाऊन नक्की कोणत्या दिशेने गेली काय झालं हे कळत नव्हतं.
बेपत्ता व्यक्तींचा घरून निघतानाच मोबाईल बंद असल्याबाबत शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला सांगितले होते. तरी मोबाईल सी. डी.आर. काढून तसेच तसेच सातारा जिल्ह्यातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पुढील तपास सुरू होता हा तपास सुरू असतानाच गोंदवलेकर महाराजांच्या मठाबाहेर त्यांची गाडी आढळल्याने त्यांचा शोध लागला. त्यांच्याकडे संबंधित पोलीस यंत्रणेही संपर्क केला असून ते सगळे सुखरूप असल्याची माहिती गुहागर पोलिसांना मिळाली आहे.
Post a Comment