काबुल - काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने मोठा हल्ला अफगाणिस्तानवर केला. त्यानंतर अफगाणिस्तानने मोठा इशारा देत म्हटले होते की, या हल्ल्याचे लवकरच आम्ही उत्तर देऊ. त्यानंतर मध्यरात्री तालिबानकडून अत्यंत मोठा हल्ला करण्यात आला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली. अफगाणिस्तानने पाकच्या अनेक सैन्य चाैक्यांवर ताबा मिळवला. अफगाण लष्करी अधिकाऱ्यांनी पाकिस्तानविरुद्ध हल्ले सुरू केल्याचे म्हटले आहे.
कुनार प्रांतात
इस्लामिक अमिराती सैन्याने केलेल्या कारवाईत 55 पाकिस्तानी
सैनिक मारले गेले आहेत, असे इस्लामिक अमिरातीच्या
प्रवक्त्याने सांगितले. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर मोठा तणाव बघायला मिळतोय.
काही महिन्यांपूर्वीच दोन्ही देशांमध्ये युद्धाची स्थिती होती, त्यानंतर
साैदी अरेबियाने मध्यस्थी करत दोन्ही देशांमधील युद्ध थांबवले. त्यानंतर गेल्याच
आठवड्यात पाकिस्तानकडून रमजान सुरू असताना मोठा हल्ला अफगाणिस्तानवर करण्यात आला.
आता त्यालाच हे उत्तर देण्यात आले.
पाकिस्तानच्या
सीमेवरील कुरापती काही कमी होण्याचे नाव घेत नाही. अफगाणिस्तानने ठिकाणांवर ताबा
घेतल्यानंतर पाकिस्तानची झोप उडाली आणि थेट अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर हवाई बॉम्बहल्ला केला.
पाकिस्तानने अफगाण तालिबानविरुद्ध ऑपरेशन सुरू केले. तशी पाकिस्तानच्या रक्षा
मंत्र्यांनी पोस्ट करून घोषणाही केली.
पाकिस्तानचा
दावा आहे की, त्यांनी अफगाणिस्तानवर केलेल्या रात्रीच्या हल्ल्यात 130 हून अधिक लोकांचा मृत्यु
झाला. दोन्ही देशातील तणाव आता शिगेला पोहोचला असून हल्ल्याची सुरूवात पाकिस्तानने
केली पण अफगाणिस्तानने दिलेले उत्तर त्यांना सहन झाले नाही आणि थेट मोठा हल्ला थेट काबूलवर केला. सध्या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला
आहे. रमजानच्या महिन्यात ही हल्ले केली जात आहेत.
अफगाणिस्ताने
दावा केला की, पाकिस्तान केलेल्या हवाई हल्ल्यांना आम्ही प्रत्युत्तर
दिले. सीमावर्ती भागात केलेल्या
कारवाईदरम्यान 15 चौक्या ताब्यात घेतल्या. दुसरीकडे पाकिस्तानने
अफगाणिस्तानच्या काही प्रमुख ठिकाणांवर हल्ला केला. ज्यामध्ये 130 हून अधिक लोकांचे जीव
गेले. याबाबत स्वत:पाकिस्तानने दावा केला. आता दोन्ही देशातील पेटलेले युद्ध
रोखण्यासाठी नक्की कोणते देश पुढे येतात हे पाहण्यासारखे ठरेल. पाकिस्तान आणि
अफगाणिस्तानच्या तणावाच्या स्थितीत भारताचे बारीक लक्ष आहे.

Post a Comment