टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल?



अहमदाबाद : भारतीय क्रिकेट संघ सलग दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. रविवारी भारत आणि न्यूझीलंड टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आमने सामने येतील. न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेचा तर भारतानं इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियानं इंग्लंडला 7 धावांनी पराभूत करत अंतिम फेरीत धडक दिली. भारतीय टीमचा विचार केला असता संजू सॅमसन दमदार फॉर्ममध्ये असून त्यानं सलग दोन सामन्यात अर्धशतकी खेळी केली आहे. जसप्रीत बुमराह, शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या देखील दमदार फॉर्ममध्ये आहेत.  

भारताला तिसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकायचा असल्यास 8 मार्चला न्यूझीलंडला पराभूत करावं लागेल. मात्र, या मॅचमध्ये भारताला काही गोष्टींमध्ये सुधारणा करावी लागेल. टीम इंडियात काही बदल होण्याची शक्यता देखील वर्तवली  जात आहे. इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात भारताचा फिरकीपटू  वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीची धुलाई करण्यात आली होती.

टीम इंडियाचा दमदार फिरकीपटू वरुण चक्रवर्ती सध्या टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध त्यानं 4 ओव्हरमध्ये 64  धावा दिल्या होत्या. वरुण चक्रवर्तीनं चार मॅचमध्ये विकेट घेतल्या मात्र त्याची जोरदार धुलाई देखील झाली आहे. वॉशिंग्टन सुंदरला वरुण चक्रवर्तीच्या जागी संधी मिळू शकते अशा चर्चा सुरु आहेत. मात्र, टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतासाठी वरुण चक्रवर्तीनं सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. वरुण चक्रवर्तीच्या नावावर या टी 20 वर्ल्ड कपमध्ये 13 विकेट आहेत.

अभिषेक शर्मा देखील अपयशी ठरत असला तरी टीम मॅनेजमेंटनं त्याच्यावर विश्वास दर्शवला आहे. संजू सॅमसन आणि इशान किशन सध्या भारताच्या फलंदाजीचे आधारस्तंभ बनले आहेत. मधल्या फळी सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी भारतासाठी महत्त्वाची फलंदाजी केली आहे. गोलंदाजीचा विचार केला असता जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या हे तीन पर्याय आहेत. वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल फिरकीची जबाबदारी स्वीकारतील.

भारताचा संभाव्य संघ - अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती

भारताचा संपूर्ण संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.


 

0/Post a Comment/Comments