जगाची झोप उडाली! चीनचा ‘एंडलेस ड्रोन’ तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी



चीनमधील Xidian University च्या संशोधकांनी संरक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारा एक प्रयोग केला आहे. आता ड्रोनला चार्जिंगसाठी जमिनीवर उतरण्याची गरज भासणार नाही, कारण चीनने ‘मायक्रोवेव्ह पॉवर’च्या मदतीने हवेतच ड्रोन रिचार्ज करण्याचे तंत्र विकसित केले आहे. या नव्या प्रयोगामुळे ड्रोन युद्धाची परिमाणेच बदलणार असून त्यामुळे जगाची झोप उडाली आहे.

तांत्रिकच नव्हे तर सामरिकदृष्ट्याही दूरगामी परिणाम ठरू शकतात, असा एक प्रयोग चीनमधील Xidian University मधील संशोधकांनी अलीकडेच सिद्ध केला. हवेत उडणाऱ्या ड्रोनमधील बॅटरी जमिनीवरून मायक्रोवेव्हच्या साहाय्याने रिचार्ज करण्याच्या चीनच्या या यशस्वी प्रयोगामुळे जगाची झोप उडाली आहे. या प्रयोगाची सविस्तर माहिती शोधनिबंधाच्या रूपात Aeronautical Science & Technology या प्रसिद्ध पीअररिव्ह्यूड जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. एकूणात, यात यशस्वी प्रयोगामुळे ड्रोनयुद्धामध्ये आमूलाग्र बदल होण्याची शक्यता असून त्यामुळे सामरिक डावपेचांमध्येही होणार आहेत.

युद्धशास्त्राचे गणित बदलणार

पहिल्या दृष्टीक्षेपात हा प्रयोग मर्यादित म्हणजेच फक्त १५ मीटर उंचीवर आणि सुमारे ३ तास असा मर्यादित होता. मात्र, या प्रयोगामागील तांत्रिक प्रगती ही भविष्यातील युद्धशास्त्राचे गणित बदलणारी ठरू शकते. आजपर्यंत ड्रोनची सर्वात मोठी मर्यादा म्हणजे त्यांची बॅटरी हीच होती. ड्रोन किती वेळ उडू शकतो, किती दूर जाऊ शकतो, किती वजन उचलू शकतो हे सारे त्याच्या बॅटरीवर अवलंबून होते. त्यामुळे कोणतेही ऑपरेशन होती घेताना ड्रोन परत येऊन चार्ज करणे किंवा नवीन ड्रोन पाठवणे अपरिहार्य होते. पण चीनच्या या प्रयोगाने या मूलभूत मर्यादेलाच आव्हान दिले आहे. 


 

0/Post a Comment/Comments