माझा प्रचार नाही केला तरी चालेल, पण...


नगरी नारद (मुक्काम पोस्ट नगर तालुका) -

दिवस मावळतिकडे झुकला होता आणि ऑक्टोबरच्या उन्हाच्या झळा अक्षरशः भाजून काढीत होत्या. चिचोंडी पाटील गटातील त्या टोकाच्या गावांकडे जनआशिर्वाद यात्रेसाठी अनुराधाताई नागवडे यांची गाडी कार्यकर्त्यांसह चालली होती .... मोठा पल्ला गाठायचा होता पुढच्या तीन गावांत लोकांना सभेची वेळ कळविली होती .... म्हणून वेळेत पोहोचणे गरजेचे होते ... दिवसभर उन्हाच्या काहिलीत भेटीगाठी सभा चालूच होत्या ... फक्त सकाळच्या नाष्ट्यावरच धावपळ चालू होती ... दुपारची जेवणवेळ केव्हाच टळून गेली होती ... कार्यकर्त्यांच्या पोटातही कावळे ओरडत होते ... फाट्यावर वडापावचा खमंग वास आला.. आणि गाडी थांबली ... दोन -दोन वडापाव खाऊन गावात पोहोचले तेव्हा कडूसं पडायची वेळ झाली होती...  

छोटेसे गाव डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले गावातील चौकात गेल्यानंतर दोन अडीचशे पुरुष व ५०-६० महिला नागवडे ताईंच्या  स्वागताला थांबलेले होते ... गाडी थांबली तशी कार्यकर्ते गाडीला सामोरे गेले काही उत्साही कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली  ...." अनुराधाताई .. तुम आगे .. हम तुम्हारे साथ है ! " ताईंनी उतरल्यावर सर्वांना शांत केले आणि चावडीकडे चालायला सुरुवात केली .... पण दोन उत्साही कार्यकर्ते मात्र काही केल्या घोषणा द्यायचे थांबत नव्हते... घोषणा देताना ते चांगलेच अडखळत होते ... तोलही जात होता ... शेवटी अनुराधाताई स्वतः मागे वळून त्यांच्याजवळ गेल्या... आन्  तीन चार फूटांवरूनच एक उग्र भपकारा आला

ताई काय समजायच्या त्या समजल्या... दादा तुमचे नाव काय आणि फक्त बापूराव एवढेच सांगितले.... " ताईंनी चेहऱ्यावर नापसंती दर्शवत जमलेल्या कार्यकर्त्यांना विचारले..." तुमच्यापैकी कोणी याला प्यायला पैसे दिले का? " सर्वांनीच नाही म्हणून सांगितले ... मग मात्र वहिनींचा आवाज थोडा वाढला .... तोवर एकजण थोडा शुद्धीत होता त्याने मागच्या मागे काढता पाय घेतला " .....

हे कायमच स्टँडवर टिंग असतात ...

आन इलेक्शन आसलं कि पार टांगा पल्टीच ...."   

एका कार्यकर्त्याने पुस्ती जोडली .... मग मात्र ताईंनी त्या तळीरामाला विचारले ...." दादा कधीपासून पिता तुम्ही ...? आन् घरची  शेतीवाडी कोण पाहतं  ....? "

बापूरावच्या तोंडातून आता मात्र शब्दही फुटेना ....

तुम्ही अशा अवस्थेत माझ्या प्रचाराला नाही आलात तरी चालेल ..... " ताई बोलल्या ....  

इलेक्शन चार दिवसांचं होईल ... पण त्या माऊलीचे काय ... 

त्या माऊलींने संसार कोणाकडे बघून करायचा ...." माझा प्रचार नाही केला तरी चालेल ..... पण त्या माऊलीकडे पोराबाळांकडे त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या  .... त्या माऊलीचा आणि लेकरांचा तळतळाट घेऊन मला माझा प्रचार करायचा नाही ...."

सगळे कार्यकर्ते आवाक् होऊन पाहत राहिले .... तुमचे संसार मोडून मला माझं राजकारण नाही करायचं ....  अशीच  बापूंची शिकवण आहे .... ताईंच्या आवाजातली धार पाहून झिंगलेला बापूराव थोडा भानावर आला .... आन हात जोडून म्हणाला   " आता पुन्हा नाही असं करणार , ताई " ....

काळजीच्या सुरात ताई उत्तरल्या ..." मला ताई  म्हणताना तुम्ही ... मग नुकत्याच झालेल्या भाऊबीजेची मला ओवाळणी म्हणून दारू पिणे सोडाल का ...? " खजील झालेल्या बापूरावने खालमानेनेच हात जोडले आन होकार दिला ... जमलेल्या समुदायाला देखील ताईंनी आपलं कुटुंब जपा , सुशिक्षित करा मुलांना चांगले शिक्षण द्या , व्यसनांपासून दूर राहा ..... शेतीकडे लक्ष द्या ... असे सांगितले .. इतक्यात - पंचाहत्तरीचे रुबाबदार फेटा घातलेले दादासाहेब ... माजी सरपंच पुढे आले .... त्यांना पाहताच ताईंनी वाकून नमस्कार केला .... थरथरत्या हातांनी .... कातर स्वरात त्यांनी " यशस्वी व्हा ...! खूप मोठ्या व्हा ...!!! " असा आशिर्वाद दिला .... आवंढा गिळून , भरून आलेल्या स्वरात म्हणाले

गेल्या ३०-४० वर्षात अनेक इलेक्शन मी जवळून पाहिलेत  ... प्रत्येक  इलेक्शनला पुढारी प्रचाराला गावात येतात ... की गावातले हे दोन-तीन बेवडे तयारच असतात .... पुढार्याच्या  नावाने बेंबीच्या देठापासून घोषणा द्यायच्या ... घोषणा दिल्या कि नेता खुश व्हायचा .... आन त्याच्या मागून चालणारा त्याचा पी ए , कार्यकर्ता मागच्या मागे हळूच या बेवड्यांच्या खिशात दोनशे - चारशे रुपये कोंबायचा, .... आन् पुढे आठवडाभर यांची सोय व्हायची , ... याहून  वाईट म्हणजे प्रत्येक वेळेला यांच्यात २-३ तरुण बेवड्यांची भर पडायची .... तुम्हीच पहिल्या आहेत .... ज्या निवडणूकीला  मते मागायला आल्यात ... आन् तरी सांगतात ... माझा प्रचार नाही केला तरी चालेल... पण व्यसने करू नका ... आपलं कुटुंब सांभाळा ..." ...

‘नागवडे राजकारणातली देवमाणसं आहेत ... असं ऐकलं होतं खरं ... पण ... आत्ता त्याची समोर प्रचिती आली’.... असे म्हणून त्यांनी ताईंना हात जोडले .... हात जोडताना त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या .... उपस्थित गावकरी देखील स्तब्ध झाले होते .... महिलांना गहिवरून आले ...

सभा सुरु झाली कार्यकर्त्यांची भाषणे झाली , लोकांनी त्यांच्या समस्या मांडल्या ... अनुराधाताईंनी त्यांचा विकासाचा आराखडा , उद्दिष्टे सांगितली , समस्या निवारणाच्या त्यांच्या योजना समजून सांगितल्या .... सभा संपली आन ताईंच्या भोवती माहिलांचा गराडा  पडला .... त्यांच्या सुख दुःखाच्या गोष्टी ऐकून घेतल्या त्यांच्याशी समरस झाल्या 

ताईंनी सर्वांना आश्वस्त केले .... आन सांगितले  कोणत्याही संकटाने डगमगू नका , हार मानू नका *चिकाटीची, जिद्दीची     'मशाल ' मनात कायम धगधगती ठेवा   ..... तुम्ही जिजाऊ , सावित्री , अहिल्येच्या लेकी आहात ...." कोणत्याही अडचणीत हाक मारा , तुमची पाठराखीण म्हणून थोरल्या बहिणी सारखी खंबीरपणे उभी राहीन .....! "        जमलेल्या सगळ्यांचाच ऊर भरून आला ....  ताईंनी सर्वांना हात जोडले .... आन्  गाडीत बसल्या ....... गाडी मार्गस्थ झाली ... पुढच्या गावात सद्गुणांची पेरणी करायला* ..... !!!

सभा संपली तशा जमलेल्या बायका स्वयंपाकाच्या काळजीने पाय उचलून  निघाल्या ..... जाता जाता त्यातल्या दोघींनी , गल्लीच्या पलिकडच्या तोंडाला असलेल्या पत्र्याच्या घरासमोर थबकत बायजाला आवाज दिला  " बायजा ss .... ए बायजा .. ss" 

बायजा आतूनच बोलली " काय गं जना , ...." 

अगं तुझ्या नवऱ्याला चांगलच सुनावलंया .... नागवडे ताईंनी ...." दारू पितो म्हणून झापलंय समद्यांसमोर .... "

हे ऐकताच बायजाने हातातली फुकणी खाली  ठेवली.. भाकरी टोपल्यात टाकली .. काथवट बाजूला सारली ... आन् हात धुतला ... पदर निटनेटका केला .... दाराला कडी घातली ... आन् झपाट्यानं पाय उचलून स्टँडवर पोहोचली .... नवरा घोळक्या पासून बाजूला  कोपऱ्यावर अंधारात खाली मान घालून उभा होता .... बायजाने शेजारच्या बाळूकाकाला  विचारले ...." मला नागवडे ताईंना भेटायचंय ... कुठयत त्या" ..... 

त्या मंदिरात दर्शनाला गेल्यात बहुतेक .... 

असे सांगून ... बाळूकाका गडबडीने बायजाला मंदिराकडे घेऊन गेला ... पण तोपर्यंत गाड्यांचा ताफा तिथून माळाच्या चढाला रस्त्याला लागलेला दिसला ....

 गाड्यांचा धुरळा अजून खाली बसला नव्हता .... बायजाने त्या धुरळ्या कडे डोळे भरून पाहिले .... त्या धुरळ्यात तिला   धूपाचा - अगरबत्तीचा दरवळ जाणवला .... तिने त्या रस्त्याकडे पाहून भक्तिभावाने हात जोडले .... आन् एवढ्या अंधारातही ... तिच्या पापण्यांच्या कडांना ... प्रकाशाचे दोन कण लटकलेले दिसले ... नकळत पदर डोळ्यांना लावत बायजा जड पावलांनी मागे वळली .... अचानक  मंदीरासमोर येऊन थबकली  बाहेरूनच हात जोडून म्हणाली .... ‘हे मारुतीराया, नागवडे ताईंना उदंड आयुष्य दे .. आणि भरभरून यश दे’...

अशाच महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी आमचा 8282835002 हा किंवा 7522957731 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये घ्या 

 

0/Post a Comment/Comments