संघटीतपणे दरोडा, घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारी टोळीवर 'मोक्का'ची कारवाई


 

अहिल्यानगर - अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यात संघटीतपणे दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व चोरी यासारखे एकुण १६ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या नागेश विक्रम भोसले व त्याच्या टोळी विरुद्ध जिल्हा पोलिस दलाने मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. 

पारनेर तालुक्यातील पठारवस्ती, सोबलेवाडी या ठिकाणी २५ जानेवारी २०२५ रोजी फिर्यादी यांचे राहते घरात अनोळखी चोरटयांनी घराचा दरवाजा तोडुन लोखंडी सळई व लाकडी दांडके घेऊन घरात प्रवेश करुन फिर्यादी व साक्षीदार यांना दमदाटी करुन साक्षीदार यांचे अंगावरील सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच मोटरसायकल असा एकुण २ लाख ७५ हजारांचा ऐवज दरोडा टाकुन चोरुन नेला होता. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३०९ (), ३२४(), () अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे तपासात सदरचा गुन्हा आरोपी सिध्देश सादीश काळे, अजय सादीश काळे, धिरज सादीश काळे, नागेश विक्रम भोसले, गणेश सुरेश भोसले, बाळू झारु भोसले, आवडया सुभाष उर्फ टुब्या भोसले, श्रीहरी हरदास चव्हाण, देवीदास जैनू काळे व विधीसंघर्षीत बालक यांनी केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यावरुन काही आरोपींना सदर गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आलेली आहे.

सदर आरोपींच्या टोळीने अहिल्यानगर जिल्हयातील पारनेर, सुपा, एम.आय.डी.सी, भिंगार कॅम्प व बेलवंडी पोलीस ठाणे हद्यीत घडलेल्या दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व चोरी अशा विविध गुन्हयांची कबुली दिली होती. त्यावरुन या टोळीविरुध्द  नाशिक परिक्षेत्र चे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे आदेशान्वये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कायद्यान्वये गुन्हयात कलमवाढ करुन गुन्हयाचा सखोल तपास करुन या टोळीविरुध्द अपर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचे पुर्वपरवानगीने मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र सादर करुन आरोपी नागेश विक्रम भोसले व त्याचे साथीदार यांचे टोळीविरुध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे.

आरोपी नागेश विक्रम भोसले व त्याचे साथीदार यांचे टोळीविरुध्द अहिल्यानगर व पुणे जिल्हयात संघटीतपणे दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व चोरी यासारखे एकुण १६ गुन्हे दाखल आहेत. त्यांचेपासुन जनसामान्यांचे जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या गुन्हेगारी टोळीविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांचे मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार कबाडी, पारनेरचे पो.नि. समीर बारवकर, .पो.नि.अभय दंडगव्हाळ, पोलिस अंमलदार रवींद्र पांडे, निखिल मुरुमकर, अभिजीत बोरुडे, सचिन वीर, विवेक दळवी यांचे पथकाने केली आहे.

0/Post a Comment/Comments