अहिल्यानगर - अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर व लोणी परिसरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दोन वेगवेगळ्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये आकस्मात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिल्या घटनेत, पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील गणेश भिवा केसकर (वय २७ वर्षे) यांनी राहत्या घरीकोणत्याही कारणावरून गळफास घेतला. ही बाब निदर्शनास येताच त्यांना उपचारासाठी तातडीने टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. परंतु, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच उपचारापूर्वी ते मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या घटनेबाबत ग्रामीण रुग्णालय टाकळी ढोकेश्वरकडून मिळालेल्याअहवालावरून पारनेर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस अंमलदार गायकवाड करत आहेत.
दुसऱ्या घटनेत, लोणी खुर्द येथील धनगर लवान रोड परिसरात राहणारी विवाहित २१ वर्षीय महिला साक्षी रोहित कुऱ्हे हिने राहत्या घरी छताच्या एंगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत तिचे सासरे शरद दत्तात्रय कुऱ्हे यांनी लोणी पोलीस ठाण्यात खबर दिली. लोणी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल डमाळे करत आहेत.

Post a Comment