अहिल्यानगरमध्ये बँकेच्या कर्मचाऱ्याकडून कर्जदारांच्या लाखो रुपयांचा अपहार


अहिल्यानगर - नगर मधील बँकेतील कर्मचाऱ्यांने कर्जदारांनी कर्जाच्या हप्त्यापोटी दिलेली रक्कम बँकेत जमा न करता एकूण ४ लाख ७२ हजार ६० रुपयांचा अपहार केल्याची घटना नागापूर येथील कोटक महिंद्रा बँक येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी बँकेचा कर्मचारी सुनील दिलीप सोनटक्के (रा. चांदगाव रोड, सोनटक्के वस्ती, पाथर्डी) याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बँकेचे प्रतिनिधी संजय रघुनाथ भंडारे (वय ४५, रा. नामगंगा रिसॉर्ट जवळ, सारसनगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सुनील सोनटक्के याने ९ नोव्हेंबर २०२३ पासून कोटक महिंद्रा बँक एम्पलोयी आयडी  वापरुन बँकेच्या नागापूर शाखेच्या वेगवेगळ्या कर्जदाराकडून ४ लाख ७२ हजार ६० रुपये घेऊन बँकेत जमा न करता स्वतःकडे जमा करुन घेऊन बँकेची फसवणूक केली.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संजय भंडारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील सोनटक्के यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम ४२०, ४०६, ४०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments