नगर – नगरहुन सुप्याकडे जाणाऱ्या मोटारसायकल ला एस.टी.बसने जोरदार धक्का दिल्याने दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना नगर पुणे रोडवरील कामरगाव शिवारातील हॉटेल स्माईल स्टोन समोर २ ऑगस्ट रोजी सकाळी घडली.
ओमप्रकाश रामकिशोर (वय ३४, रा. अयाह, फतेहपूर, उत्तरप्रदेश, हल्ली रा.शेंडी ता.नगर) असे मयताचे नाव आहे. याबाबत राकेशकुमार ग्यानी (वय ३४ रा. पखरौली, ता. फतेहपूर, उत्तरप्रदेश,हल्ली रा.शेंडी ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात ७ ऑगस्ट रोजी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांचे मेव्हणे ओमप्रकाश रामकिशोर यांच्यासह बजाज पल्सर दुचाकी (क्र. एम एच १६ बी एस ६९६५) ने शेंडी येथून सुप्याकडे कामासाठी जात असताना कामरगाव शिवारात, हॉटेल स्माईल स्टोनजवळ, ते एका कारला ओव्हरटेक करत असताना, पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या एस.टी. बस (क्र. एम एच १४ बी टी ४२६१) चालक तुकाराम तोलाजी सुळ, (शेगाव आगार) याने दुचाकीला जोरदार धक्का दिला. या धक्क्याने दुचाकी वरील दोघेही रस्त्यावर पडले. दुर्दैवाने बसचे चाक ओमप्रकाश रामकिशोर यांच्या डोक्यावरुन गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ सिव्हिल हॉस्पिटल, येथे दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी राकेश कुमार ग्यानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बस चालक तुकाराम सुळ यांच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ आव्हाड हे करीत आहेत.
Post a Comment