अहिल्यानगर - पोखर्डी गावाच्या शिवारातील पिंपळगाव उजनी रोडवर सुरू असलेल्या कोंबड्यांच्या झुंजीवरील जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (२९ मार्च) दुपारी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी झुंजीवर पैसे लावून जुगार खेळणाऱ्या २१ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून २४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार विष्णू भागवत यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोखर्डी शिवारातील एका मोकळ्या जागेत कापडी मंडप टाकून कोंबड्यांची झुंज लावली जात होती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पैशांची हारजित सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास छापा टाकला.
यावेळी शुभम राजेश बोध (वय-27 वर्षे रा. झेंडीगेट, अहिल्यानगर), आशरफ बाहुला खान (वय-50 वर्षे रा. आलमगीर ता.जि. अहिल्यानगर), मोहम्मद उस्मान अली शेख (वय-40 वर्षे रा. महिम उन्नती सोसायटी मुंबई), अमजद युसुफ मगदुम (वय-43 वर्षे रा. येरवडा पुणे), सय्यद अझर अक्तर (वय-40 वर्षे रा. पंचपिर चावडी अहिल्यानगर), रोहीत श्रीचंद गोहिर (वय-33 वर्षे रा. हरिचामळा दरेवाडी, ता.जि. अहिल्यानगर), संदिप ओमप्रकाश कुडीया (वय-32 वर्षे रा. वसंत टेकडी अहिल्यानगर), राम हिरालाल क्षत्रिय (वय-46 वर्षे रा. भद्रकाली फुले मार्केट नाशिक), तौफिक सिकंदर शेख (वय-28 वर्षे रा. नेवासा खुर्द ता.नेवासा), अजहर खुदाबक्श शेख (वय-34 वर्षे रा. मुकुंदनगर अहिल्यानगर), योगेश मनोहर छजलांनी (वय-40 वर्षे रा. हरिचामळा दरेवाडी, ता.जि. अहिल्यानगर), संतोष गणेश गोयल (वय- 39 वर्षे रा. शाहापुर ता.जि. अहिल्यानगर), विकी लक्ष्मण सुजगोहर (वय-46 वर्षे रा. येरवडा पुणे), जितेंद्र चंद्रकांत म्हात्रे (वय- 40 वर्षे रा. भिवंडी जि.ठाणे), अमीन सरदार शेख (वय-42 वर्षे रा. गजराजनगर ता.जि. अहिल्यानगर), तुषार संतोष मुलतांनी (वय-29 वर्षे रा. मगळवारपेठ पुणे), समीर फिरोज शेख (वय-22 वर्षे रा. अकोले नाका संगमनेर), वसीम सलीम शेख (वय-70 वर्षे रा. येरवडा पुणे), गोविंद शाम राजुडीया (वय-63 वर्षे रा. मंगळवारपेठ पुणे), सोहेल कबीर सय्यद (वय-38 वर्षे रा. मुकुंदनगर अहिल्यानगर), उत्तम एकनाथ साळवे (वय-40 वर्षे रा. देवळाली कॅम्प, नाशिक जि.नाशिक) हे कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळताना रंगेहाथ पकडले गेले.
पोलिसांनी या सर्वांविरुद्ध महाराष्ट्र जुगारबंदी कायद्यासह प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याच्या अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस हवालदार दिवटे करत आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार कबाडी यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी स.पो.नि. हरिष भोये, पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, समीर अभंग, पोलीस अंमलदार सुरेश माळी, विष्णु भागवत भिमराज खर्से, प्रशांत राठोड, सागर ससाणे, चालक उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment