नगर तालुका (प्रतिनिधी) - घरात बाथरूमची भिंत अंगावर कोसळून ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील जेऊर गावात २० मार्च रोजी दुपारी १ च्या सुमारास घडली. दिगंबर बाबुराव काळे (रा. जेऊर, ता.नगर) असे मयताचे नाव आहे.
मयत दिगंबर काळे हे दुपारी घरात असताना त्यांच्या घरातील बाथरूम ची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना त्यांचे नातेवाईक अजिनाथ काळे यांनी तातडीने उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
तेथे उपचार सुरु असताना सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे मेडिकल ऑफिसर डॉ. खराडे यांनी घोषित केले. याबाबतचा अहवाल एमआयडीसी पोलिसांना पाठविण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Post a Comment