एपीआय प्रल्हाद गिते यांचे पोलिस निरीक्षक पदी प्रमोशन


अहिल्यानगर - राहुरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद भानुदास गिते यांची पोलिस निरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे. त्यांना पुणे येथे राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) नियुक्ती देण्यात आली आहे. गिते यांना शासननिर्णयानुसार त्यांच्या मूळ सेवाज्येष्ठते नुसार ही पदोन्नती देण्यात आली आहे.

राज्यातील २०१ सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीचे आणि महसूल विभाग वाटपाचे आदेश राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या आदेशानुसार विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) सुप्रिया पाटील यादव यांनी ९ एप्रिल रोजी दुपारी काढले आहेत. या २०१ जणांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात कार्यरत असलेले स.पो.नि. प्रल्हाद गिते हे एकमेव आहेत. गिते यांनी २ वर्ष नगर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून काम केलेले असून त्यांची नुकतीच राहुरी पोलिस ठाण्यात बदली झाली होती. पदोन्नती आदेशाबरोबरच त्यांना पुणे महसूल विभाग देण्यात आला असून पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) पदस्थापना देण्यात आली आहे

 


0/Post a Comment/Comments